No makeup look! मेकअप नसतानाही दिपिका अन् प्रियांकाच्या तोडीस तोड ठरला पायल रोहतगीचा वेडिंग लूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 2:48 PM1 / 9छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी हिने नुकतीच (९ जुलै) प्रियकर आणि अभिनेता संग्राम सिंह याच्यासोबत लग्नगाठ बांधली.2 / 9वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येणारी पायल गेल्या कित्येक वर्षांपासून संग्रामला डेट करत होती. 3 / 9लॉकअपमध्ये असताना पायलने संग्रामसोबतच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. १२ वर्ष एकमेकांना डेट केलेल्या या जोडीने आग्रामध्ये लग्नगाठ बांधली.4 / 9लग्नानंतर पायलने या सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा नो मेकअप लूक चर्चेचा विषय ठरत आहे.5 / 9पायलने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले.6 / 9व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पायलने लाल रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला आहे. परंतु, यावेळी तिने कोणताही मेकअप केलेला नाही.7 / 9लग्नामध्ये पायलने लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर दागदागिने परिधान केले होते. तर, संग्रामने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.8 / 9आग्रामधील जेपी हॉटेलमध्ये पायल-संग्रामने मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.9 / 9लग्नानंतर पायल-संग्राम मुंबई आणि दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications