Athiya Shetty Kl Rahul New Wedding : वाचा, अथिया शेट्टीच्या वेडिंग फोटोमागची गोष्ट...,खुद्द फोटोग्राफरने शेअर केला किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 3:38 PM1 / 8 बॉलिवूड अभिनेत्री सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी गत २३ जानेवारीला किक्रेटपटू के. एल. राहुलशी लग्नगाठ बांधली. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2 / 8आता अथियाच्या लग्नाचे काही नवे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाने शेअर केले आहेत. शिवाय या फोटोमागची स्टोरीही त्याने सांगितली आहे.3 / 8तर रोहननेच आपल्या लग्नाचे फोटो काढावेत, अशी अथियाची इच्छा होती. तिने रोहनला फोन केला. रोहन होकार देईल, असा तिला विश्वास होता.4 / 8पण रोहनने आधी नकार दिला. लग्न उद्या आहे आणि माझ्याकडे माझा कॅमेरा नाहीये. मी सध्या लोणावळ्यात आहे, मी नशेत आहे, असं रोहनने तिला स्पष्ट सांगितलं.5 / 8अथिया ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. मला ते काहीही माहित नाही. तूच माझ्या लग्नाचे फोटो काढणार, असं तिने पलीकडून म्हटलं आणि रोहन अथियाचे फोटो क्लिक करायला पोहोचला.6 / 8या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. रोहन श्रेष्ठाने अथियाचा खास दिवस आणखी खास केला. तिचे एकापेक्षा एक सुंदर फाेटो क्लिक केलेत आणि ते शेअरही केलेत.7 / 8रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून रोहन श्रेष्ठा हे फोटोग्राफी क्षेत्रातलं एक मोठं नाव बनलं आहे.8 / 8लग्नाच्या सर्व फोटोंमध्ये अथिया कमालीची सुंदर दिसतेय. नववधूच्या पोशाखात तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications