सुपर फिट !! बाळंतपणानंतर शूटींगवर परतली करिना कपूर; ग्लॅम लूक पाहून सगळेच झाले थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 4:22 PM1 / 9गेल्या महिन्यात 21 तारखेला करिना कपूर दुस-यांदा आई झाली. तिने दुस-या मुलाला जन्म दिला आणि आज बरोबर महिनाभरानंतर करिना कामावर पतरलीये. होय, ते सुद्धा सुपर फिट अवतारात.2 / 9दुस-या मुलाच्या जन्मानंतर करिना शूटींगवर परतली आणि तिला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.3 / 9यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत करिना कपूर जबरदस्त फिट दिसतेय. तिचा फिटनेस हैराण करणारा आहे.4 / 9दुस-या प्रेग्नंसीकाळात करिनाचे वजन चांगलेच वाढले होते. पण महिनाभरात करिना ब-यापैकी स्लिम झालेली दिसतेय.5 / 9 प्रसूतीनंतर लगेच महिनाभरात करिनाला इतके स्लिम आणि फिट बघून चाहतेही अवाक् झालेत.6 / 9 पहिल्या मुलाच्या जन्मानंतरही करिनाचे वजन प्रचंड वाढले होते. मात्र दोनच महिन्यात ती पुन्हा आपल्या फिगरमध्ये परतली होती.7 / 9दोन्ही प्रेग्नंसीदरम्यान करिना अगदी शेवटपर्यंत काम करत होती. अगदी प्रसूतीच्या दोन दिवसआधीपर्यंत ती शूटींग करत होती.8 / 9आता चाहते करिनाला पुन्हा एकदा मोठ्या स्क्रिनवर पाहण्यास उत्सुक आहेत.9 / 9अद्याप करिनाने तिच्या दुस-या मुलाच्या नावाचा खुलासा केलेला नाही. त्याचा एक फोटो मात्र तिने शेअर केला होता. अर्थात त्यात त्याचा चेहरा दिसला नव्हता. आणखी वाचा Subscribe to Notifications