"माझ्या जवळ आला, अंगाशी ओढलं..." टीव्ही इंडस्ट्रीतल्या मराठी अभिनेत्रीचा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 10:40 AM1 / 10टीव्ही इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचबाबत खूप प्रकार समोर येतात. अनेक अभिनेत्रींनी त्यांचे कास्टिंग काऊचबाबतचे वाईट अनुभव मुलाखतीत शेअर केले होते. आता अभिनेत्री रुतुजा सावंतने तिला आलेल्या अनुभवाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 2 / 10टीव्ही अभिनेत्री रुतुजा सावंत कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. नुकत्याच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे. तिच्यासोबत घडलेली घटना शेअर करताना ती म्हणाली, माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला एकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. 3 / 10माझ्या आयुष्यातील ही सर्वात भयानक घटना होती असं रुतुजा सावंतने म्हटलं. संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑडिशन देणे सामान्य आहे. मी वयाच्या २० व्या वर्षी कामाच्या शोधात असताना, एके दिवशी मला एका एजंटचा फोन आला ज्याने मला त्याच्या कार्यालयात मीटिंगसाठी यायला सांगितले. 4 / 10मी कामाबाबत चर्चा करण्यासाठी एजंटला भेटायला गेले तेव्हा तो माझ्या जवळ आला आणि मला धरून अंगाशी ओढलं. या घटनेने मी खूप घाबरले आणि त्यावेळी तेथून पळ काढल्याचे अभिनेत्री रुतुजा सावंतने पहिल्यांदाच उघड केले. 5 / 10रुतुजा पुढे म्हणाली की, त्या घटनेतून मी धडा घेतला आहे, आता मी कोणाला भेटताना जास्त काळजी घेते. मीटिंग्जपूर्वी मी नेहमी कोणालातरी माझ्यासोबत घेऊन जाते, विशेषत: ज्यांना मी ओळखत नाही. मी त्यांना भेटण्यापूर्वी त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन जाते असं तिने म्हटलं. 6 / 10रुतुजा सावंतने 'मेहंदी है रचने वाली', 'छोटी सरदारनी' आणि 'पिशाचिनी' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'मेहंदी है रचने वाली शोमधून रुतुजाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात तिने व्हिलेनची भूमिका निभावली होती. 7 / 10काही महिन्यांपूर्वी रौशनी श्रीवास्तव, नीना गुप्ता, यासारख्या अभिनेत्रींनीही कास्टिंग काऊचबाबत भाष्य केले होते. या इंडस्ट्रीत टिकणे काही सोपे नसल्याचं रौशनी श्रीवास्तव म्हणाली होती. अनेक संकंटांचा सामना तिने केला असल्याचं म्हटलं. 8 / 10तर नीना गुप्ता यांनी त्यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’(Sach Kahun Toh: An Autobiography)कास्टिंग काऊचचा त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे. त्या लिहितात, 'होय कास्टिंग काऊच आहे. अनेकदा तुमच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली जाते. पण हे सर्व तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. 9 / 10माझ्या अनुभवांवरून मी सांगू शकते की जर तुम्ही असं काही केलं तरी याची काहीच खात्री नाही की त्यानंतर तुम्हाला चांगली भूमिका मिळेल. कारण हा एक व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये जे विकलं जातं तेच घ्यावं लागतं असं नीना गुप्ता यांनी सांगितले. 10 / 10केवळ अभिनेत्रींनाच नव्हे तर अभिनेत्यांनाही कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. बिग बॉस फेम अंकित गुप्ताने नुकताच हा अनुभव शेअर केलाय. 'इथे तर तडजोड करावीच लागते. नाहीतर सहज काम मिळत नाही. आम्ही आतापर्यंत अनेक लोकांना लॉंच केले आहे. त्या लोकांची नावंही त्याने घेतली' असं अंकित म्हणाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications