पूनम ढिल्लोला आता विसरा; तिच्या लेकीच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री पडतायेत फिक्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 4:18 PM1 / 10एकेकाळी आपल्या सौंदर्याने असंख्य तरुणांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूनम ढिल्लो.2 / 10गेल्या काही वर्षांमध्ये पूनम ढिल्लोचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिची लोकप्रियता अद्यापही कायम आहे.3 / 10सोशल मीडियावर सक्रीय असलेली पूनम कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते.4 / 10सध्या सोशल मीडियावर पूनमच्या लेकीचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिची लेक सौंदर्याच्या बाबातीत आपल्या आईलादेखील मागे टाकते.5 / 10पूनम ढिल्लोच्या लेकीचं नाव पलोमा ढिल्लो असं असून तीदेखील आईप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असते.6 / 10अनेकदा पलोमा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती सौंदर्याच्या बाबतीत लोकप्रिय स्टारकिड्सला मागे टाकताना दिसत आहे.7 / 10पूनम ढिल्लोने त्रिशूल (1978), काला पत्थर (1979), नूरी (1979) असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर तिने १९८८ मध्ये चित्रपट निर्माते अशोक ठकेरिया यांच्यासोबत लग्न केलं.8 / 10पूनम आणि अशोक यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यामुळे त्यांनी १९९८ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.9 / 10पूनम आणि अशोक यांना अनमोल आणि पलोमा ही दोन मुलं आहेत. सध्या या मुलांचा सांभाळ पूनमच करत आहे.10 / 10अलिकडेच पलोमाने एक फोटोशूट केलं असून त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यावर सौंदर्यांमध्ये ती पूनम ढिल्लोलाच टक्कर देतीये असं नेटकरी म्हणत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications