Join us

"भारत World Cup जिंकला तर कपडे..."; पूनम पांडेचे 'ते' 8 वाद, उद्ध्वस्त झालं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 12:39 PM

1 / 10
मायानगरीत असे अनेक कलाकार आहे जे कायम काही ना काही वादांमुळे चर्चेत राहिले. त्यांच्यापैकीच एक आहे मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey). बोल्डनेस, अश्लीलतेशीच तिचा कायम संबंध जोडला गेला आहे. पूनमचं नुकतंच कॅन्सरने निधन झालं असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
2 / 10
पूनम पांडे तिच्या बोल्डनेसमुळेच पुढे आली होती. पूनम आणि वाद असं समीकरणंच झालं होतं. नेमक्या कोणकोणत्या वादात ती अडकली आहे बघुया.
3 / 10
लॉकडाऊनच्या काळात पूनम नियमांचं उल्लंघन करत रस्त्यावर हिंडत होती. तिच्यासोबत तिचा होणारा नवराही होता. नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
4 / 10
2011 साली पूनमच्या एका विधानामुळे खळबळ माजली होती. जर भारत विश्वकप जिंकला तर न्यूड होईन असं ती म्हणाली होती. तिने BCCI ला तशी चिठ्ठीही लिहिली होती. तेव्हा तिचं वय केवळ 18 वर्षे होतं. तिच्या या वक्तव्यानंतर खूप वादा झाला. अगदी तिचं कुटुंबही तिच्या विरोधात गेलं होतं.
5 / 10
इतकंच नाही तर पूनमने एकदा बाथरुममधून सीक्रेट डान्स करतानाचा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता. माय बाथरुम सीक्रेट्स या नावाने तो व्हिडिओ होता. यानंतर झालेल्या वादामुळे युट्यूबने तिचा व्हिडिओो ब्लॉक केला होता.
6 / 10
2012 साली पूनम पुन्हा न्यूड होण्यासंबंधी विधान केलं आणि ती चर्चेत आली. त्यावर्षीच्या आयपीएल IPL मध्ये शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्स टीम जिंकली तर न्यूड होईन असं ती म्हणाली होती. आणि तसंच घडलं. त्यावर्षी KKR जिंकली आणि पूनमने तिचा न्यूड फोटो पोस्ट केला होता.
7 / 10
2013 साली पूनम तिचा पहिला सिनेमा 'नशा'च्या पोस्टरमुळे वादात अडकली. काही राजकीय संघटनांनी जागोजागी लावलेले पोस्टर्स जाळून टाकले होते.
8 / 10
2017 मध्ये पूनमने एक अॅप लॉन्च केलं होतं. या अॅपवरुनही मोठा वाद झाला होता. प्ले स्टोरवरुन अॅप बॅनही करण्यात आलं. ते तिने राज कुंद्राशी संपर्कात राहण्यासाठी केलं होतं असं ती म्हणाली. यासाठी तिला हायकोर्टापर्यंत गेली होती.
9 / 10
2020 मध्ये पूनमने पती सॅम बॉम्बेसोबत लग्न केले. लग्नानंतर १० च दिवसात तिने पतीवर मारहाणीचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी सॅमला अटक केली होती.
10 / 10
त्याचवर्षी तिने राज कुंद्रावर केस दाखल केला होती. कॉन्ट्रॅक्ट संपला तरी तिच्या कॉन्टॅक्ट्सचा वापर केल्याचा आरोप पूनमने लावला होता.
टॅग्स :पूनम पांडेमृत्यूसोशल मीडियाट्रोल