‘या’ मराठी कलाकारांनी मध्येच सोडली मालिका; वाचा काय होते कारण By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 8:00 AM1 / 9‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडा एका रात्रीतून बाद झाली. अर्थात मालिकेतून कलाकार बदलण्याची ही वेळ नाही. मराठी मालिकांमधून असेच अनेक चेहरे अचानक बाद झालेत. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी2 / 9प्राजक्ता गायकवाड- ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतून प्राजक्ता गायकवाडला बाहेर काढण्यात आले आणि यानंतर मालिकेच्या सेटवरचा वाद चव्हाट्यावर आला होता. अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक आरोप केले होते. प्राजक्तानेही प्रत्यारोप केले होते. प्रत्यक्षात सहकलाकारासोबत झालेल्या वादामुळे प्राजक्ता या मालिकेतून बाहेर पडली होती.3 / 9ईशा केसकर - माझ्या नव-याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारणाºया ईशाने मालिका सोडली तेव्हा अनेकांची निराशा झाली होती. ईशाने स्वत: काही खासगी कारणाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.4 / 9शिवानी सुर्वे- ‘देवयानी’ या मालिकेत शिवानी सुर्वे लीड भूमिकेत होती. मात्र निर्मात्यांची वाजले आणि यानंतर तिने मालिकेला रामराम ठोकला होता. 5 / 9किरण ढाणे, विद्या सावळे - ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी किरण ढाणे हिने मनासारखे मानधन मिळत नाही म्हणून मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. ‘लागीरं झालं जी’ याच मालिकेत मामीची भूमिका साकारणा-या विद्या यांनी सुद्धा मानधनाच्याच वादामुळे मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.6 / 9दिपाली पानसरे- अभिनेत्री दिपाली पानसरे हिने नुकतीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला रामराम ठोकला होता. कोरोनाला घाबरून तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. 7 / 9संजय मोने- संजय मोने यांनी तर मालिका प्रसारित होण्याआधीच मालिका सोडली. होय,‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या शीर्षकगीताचे शूटिंग संजय मोनेंसोबत झाले होते. मात्र प्रत्यक्षात मालिका प्रसारित झाली तेव्हा त्यांच्या जागी गौतम जोगळेकर पाहायला मिळाले होते.8 / 9रवी पटवर्धन- ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील आजोबा अर्थात रवी पटवर्धन हेही एका रात्रीत मालिकेतून बाहेर पडले. कोरोना काळात वयोवृद्ध कलाकारांना शूटींग करण्यास बंदी घातल्याने ते मालिकेतून बाहेर पडले. 9 / 9वंदना गुप्ते- ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील दुर्गा मॅडमची भूमिका साकारणाºया अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही मालिका सोडली. का? याचे कारण मात्र अजूनही बाहेर आलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications