Prajakta Mali Birthday : तुमच्या लाडक्या प्राजूला अभिनेत्री व्हायचं नव्हतंच...! ‘या’ एका कारणामुळे अभिनयात आली...!! By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 12:20 PM1 / 12चाहत्यांची लाडकी प्राजू अर्थात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस. आज प्राजक्ता 34 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 2 / 12आज प्राजक्ता मोठी अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या एक एक अदांवर चाहते फिदा आहेत. पण प्राजक्ताला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?3 / 12 अभिनेत्री होण्याचा विचारही तिने कधी केला नव्हता. मग ती अभिनय क्षेत्रात आली कशी तर अपघाताने. होय, अपघाताने ती अभिनेत्री झाली.4 / 12सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात खुद्द प्राजक्ताने हा खुलासा केला. या मुलाखतीत तिने अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास सांगितला.5 / 12प्राजक्ताला डान्स विषयातच करिअर करायचं होतं पण ती अगदी अपघाताने अभिनय क्षेत्रात आली. त्यामुळे सुरूवातीची अनेक वर्ष तिने अभिनय फार काही गंभीरपणे घेतला नव्हता, असं तिने या मुलाखतीत सांगितलं. 6 / 12मुलाखतीत ती म्हणाली, मी मूळची पुण्याची. ललित कला केंद्रात मी नृत्य विषयात एमए करत होते. त्यावेळी योगायोगाने डान्स ग्रुपमधील एका मुलाने मला पाहिलं आणि ‘तांदळा’ सिनेमात मला अगदी छोटीशी भूमिका मिळाली. 7 / 12पुढे तिने सांगितलं, ‘त्या सिनेमाच्या सेटवर असलेल्या एका असिस्टंट डायरेक्टरने मला ‘गुड मॉर्निंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनला पाठवलं. खास म्हणजे माझी निवड सुद्धा झाली. 8 / 12मी अभिनेत्री बनेल, अभिनयात करिअर करेल, हे कधीच प्लॅन केलं नव्हतं. हे आपोआप जुळत गेलं. मी कधीच ठरवू अभिनय क्षेत्रात आले नाही कारण माझं सगळं लक्ष नृत्याकडेच होतं, असं ती म्हणाली.9 / 12 केवळ मी टीव्हीवर दिसते आणि यातून पैसे कमवता येतात याचं एक आकर्षण होतं आणि आकर्षणापोटी मी काम करत होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यातून पैशाचा प्रश्न सुटत होता. इतकंच, असंही ती म्हणाली.10 / 12 शिक्षण पूर्ण केल्यावर मी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण तोपर्यंतही अभिनय मी फार सीरिअसली घेतला नव्हता. पण ‘जुळून येति रेशीमगाठी’ या मालिकेनंतर मला या क्षेत्राचं गांभीर्य जाणवलं, असं ती म्हणाली.11 / 12 फक्त मोठी मालिका आहे रोल छान आहे म्हणून ‘जुळून येति रेशीमगाठी’ ही मालिका मी करत होते. पण मालिकेने मला मिळालेली लोकप्रियता, प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे सगळं जाणवल्यावर मला या कामाचा सिरियसनेस कळला आणि मी पूर्णपणे अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवलं, असं ती म्हणाली. 12 / 12मी फार काही काम केलेलं नाही. पण जेवढं काही काम केलं, त्या मोजक्या कामानं मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवून दिलं. चाहत्यांच्या या प्रेमापोटीच मी आज इथवर पोहोचले आहे, असंही ती म्हणाली. आणखी वाचा Subscribe to Notifications