Join us

Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं तिच्या लग्नासाठी आईला स्वत: सुचवलं होतं स्थळ, जाणून घ्या कोण आहे हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 12:37 PM

1 / 8
महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूप चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात.
2 / 8
सध्या प्राजक्ताच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ती लग्न कधी करणार हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.
3 / 8
प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत तिच्या क्रशबाबत खुलासा केला आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्राजक्ताचा क्रश असल्याचे तिने नुकतेच सांगितले आहे.
4 / 8
एका मुलाखतीत प्राजक्ताला तुझा मराठी चित्रपटसृष्टीतील क्रश कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले.
5 / 8
'माझा सिनेसृष्टीतील नानी नावाचा सुपरस्टार क्रश आहे. पण मराठी सिनेसृष्टीतील क्रशबद्दल बोलायचं तर अभिनेता वैभव तत्त्ववादी हा माझा एकेकाळी क्रश होता.' असा खुलासा प्राजक्ताने केला आहे.
6 / 8
एवढेच नाही तर प्राजक्ताने तिच्या आईला 'हा तुला जावई म्हणून चालेल का' असे देखील विचारले होते.
7 / 8
वैभव तत्ववादीच्या 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटानंतर तिचा तो क्रश झाला होता. पण प्राजक्ताने त्याला हे कधीच सांगितले नाही.
8 / 8
वैभव आणि प्राजक्ता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. लवकरच त्यांचा एक चित्रपट सुद्धा येणार आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी