Join us

हास्यजत्रेच्या कलाकारांचं मानधन किती? अभिनेता पृथ्वीक प्रतापने अख्खं गणितच मांडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 2:11 PM

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. या विनोदी कार्यक्रमातून सगळेच कलाकार अगदी खळखळून हसवतात. या कार्यक्रमात अगदी सिनिअर मंडळीही आहेत तर अनेक नवीन कलाकारही आहेत.
2 / 9
हा शो बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की या कलाकारांचं नेमकं मानधन किती असेल. सर्वच कलाकारांना एकसारखंच मानधन मिळत असेल का, कलाकारांना दर महिन्याला पगार देत असतील की एकदम पैसे दिले जात असतील असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच.
3 / 9
कलाकारांच्या मानधनाबाबत हास्यजत्रेतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) स्पष्ट बोलला आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने मानधनाचा थेट आकडाच सांगितला आहे.
4 / 9
पृथ्वीक म्हणाला,'अशी कोणतीही ठराविक रक्कम नसते जी कलाकारांना मिळेलच. प्रत्येक कलाकाराला वेगवेगळी रक्कम मिळते. मग ही रक्कम महिन्याला २० हजारांपासून ते २ लाखांपर्यंतही जाते. कधीकधी ती ५ लाखांपर्यंत पण जाते.
5 / 9
यात बघितलं तर २० हजारही आहेच. आपला सध्या प्रॉब्लेम झालाय की आपण सगळेच मोठ्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. आपल्याला वाटतं या व्यक्तीला ५ लाख मिळत आहेत मग आपल्याला का नाही.पण आपण हे लक्षात घेत नाही की कधीतरी त्या व्यक्तीने सुद्धा २० हजारांपासून सुरुवात केली असते.
6 / 9
अनेकांना महिना १५ हजार, १० हजारही मिळतात. ज्युनिअर आर्टिस्ट असतात त्यांना दिवसाला ८०० रुपये मिळतात. ते दहाच दिवस काम करतात. त्यामुळे अशा कमी मानधनातही लोक काम करतात. जेव्हा तू अगदी नवीन असतोस, तुझी पहिली डेली सोप असते तेव्हा तुला सांगतात दिवसाला दिड ते दोन हजार मिळतील.
7 / 9
आपण थोडे प्रसिद्ध झालो की अचानक कळतं की आज तुझा दिवसाला पगार ३० हजार रुपये आहे. मग असं होतं की एवढे पैसे? किती दिवस काम करणार, ८/१० दिवस? मग ते दिवस खूप मोठे व्हायला लागतात कारण आपण १० दिवसात ३ लाख रुपये कमावलेले असतात. त्यामुळे यात अडकलं नाही पाहिजे. आपल्याला मिळणाऱ्या मानधनात घर सुरक्षित केलं पाहिजे.
8 / 9
मला आत्ता ६० हजार रुपये महिन्याला मिळतात. त्यात २० हजार रुपये घरभाडं, २० हजार रुपये एसआयपी, १० हजार इन्श्युरन्स यात ४० हजार गेले. उरलेल्या २० हजारात मी आयुष्य जगतो. त्यात माझ्या कुटुंबाचा मेडिकल खर्च निघतो. उरलेले पैसे तुम्हाला कशात आनंद मिळतोय त्यात गुंतवा.
9 / 9
मीही खूप चुका केल्या आहेत. आधी मी पैसे उडवायचो. मग कळलं ओहोहो हे वेगळं आहे. हे उलटं आहे. ४ सिनेमे केल्यानंतर मी इंटर्नशिप केली. तेव्हा मला ५ हजार मिळाले. मी ते उडवले. जेव्हा घरच्यांनी विचारलं घरखर्चाला किती देणारेस. तेव्हा मला वास्तविकता समजली.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारगुंतवणूक