कधी झाल्या आई, तर कधी प्रसंगी बापही..! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी सिंगल मदर म्हणून केला मुलांचा सांभाळ By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 4:41 PM1 / 6लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे या देखील सिंगल मदर आहेत. लक्ष्मीकांत यांच्या मृत्यू नंतर प्रिया यांनी दुसरं लग्न केलं नाही. तर अभिनय आणि स्वानंदी या दोन्ही मुलांना त्यांनीच वाढवलं. 2 / 6अभिनेत्री रेशम टिपणीस ही सुद्धा एक सिंगल मदर आहे. रेशमने अभिनेता संजीव सेठ यांच्याशी लग्न केलं होत पण 2004 साली दोघंही विभक्त झाले. रेशम ला 2 मुलं आहेत. दोघांचा ही ती एकटीच सांभाळ करते. 3 / 6अभिनेत्री सई ताम्हणकरची आई मृणालिनी ताम्हणकर या सुद्धा सिंगल मदर आहेत. सई कॉलेजल असतानाच तिच्या आई बाबांचा घटस्फोट झाला. त्यानंतर साईची संपूर्ण जबाबदारी ही तिच्या आईने घेतली. 4 / 6अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी सखी गोखले ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शुभांगी यांचे पती अभिनेते मोहन गोखले यांचं सखी अगदी लहान असतानाच अकस्मात निधन झालं. त्यानंतर शुभांगी यांनी दुसरं लग्न केलं नाही तर त्या सिंगल मदर बनून सखीचा सांभाळ केला. 5 / 6सिद्धार्थची आई सीमा चांदेकर या एक अभिनेत्री आहेत.. पण त्याच बरोबर त्या एक सिंगल मदर सुद्धा आहेत. सिद्धार्थ लहान असल्यापासून त्यांनी सिद्धार्थ आणि त्याची बहीण दोघांचा एकटीने सांभाळ केला.6 / 6अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई अभिनेत्री ज्योती चांदेकर या देखील सिंगल मदर आहेत. त्या देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तेजस्विनी आणि तिच्या बहिणीच्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्योती चांदेकर यांनी सिंगल मदर म्हणून पार पाडल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications