Join us  

Than & Now : 23 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं झालं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 8:00 AM

1 / 10
Happy B'day Priyanka Chopra: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने जगभरात एक जबरदस्त ओळख निर्माण करणाऱ्या प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस आहे. होय, 18 जुलै 1982 रोजी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 10
प्रियंकाने 2000 साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. प्रियंकाच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज चढला, त्यावेळी तिचे वय 18 वर्षे होते. प्रियंकाने 95 ब्युटी क्वीनला हरवून मिस वर्ल्डचा खिताब जिंकून जगभरात भारताचे नाव उंचावले होते.
3 / 10
प्रियंकाला मिस वर्ल्ड होऊन जवळपास 22-23 वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हापासून प्रियंकाच्या लूकमध्ये बरेच बदल पाहायला मिळाले आहेत.
4 / 10
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा नेहमीच सुंदर असते, परंतु 2000 ते 2023 पर्यंत प्रियांकाच्या लूकमध्ये बरेच बदल झाला. ही अभिनेत्री आता पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश, बोल्ड, ग्लॅमरस झाली आहे.
5 / 10
प्रियंका आज अनेक तरुणींसाठी प्रेरणा बनली आहे. प्रियंका अनेक मुलींना आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी प्रेरित केले आहे.
6 / 10
प्रियंका चोप्राला ओळखणे कठीण होत असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे.
7 / 10
जुने फोटो पाहिल्यावर लक्षात येते प्रियंकामध्ये आता जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळत आहे.
8 / 10
बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपट प्रियंका चोप्राच्या नावावर आहेत. तिने हॉलिवूडमध्येही आपले पाऊल ठेवले आहे. अभिनयासोबतच प्रियंका एक यशस्वी बिझनेस वुमन देखील आहे.
9 / 10
निक आणि प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रितीरिवाजांनी विवाह केला. मालतीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.
10 / 10
लवकरच ती ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. याशिवाय ती 'केजीएफ' (KGF) सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप मेकर्सकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.
टॅग्स :प्रियंका चोप्रा