न्यूयॉर्कमध्ये जिथे-तिथे प्रियंका दिसे...! चाहते म्हणाले, आम्हाला तुझा अभिमान By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:37 AM1 / 10प्रियंका चोप्रा आता केवळ बॉलिवूड अभिनेत्री राहिलेली नाही तर ग्लोबल स्टार झालीये. शिवाय लेखिका अशीही तिची नवी ओळख आहे. प्रियंकाचे पहिलेच पुस्तक जगभर चर्चेत आहे. न्यूयॉर्क सिटीच्या 6 मजली बिलबोर्डवर सध्या प्रियंकांच्या या पुस्तकाचे कव्हरपेज झळकत आहे.2 / 10प्रियंकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले आहे. आता ... बाहेर 6 मजली बिलबोर्डवर तिच्या या पुस्तकाचे कव्हर पेज झळकले आहे. पीसीसाठी हा मोठा क्षण आहे आणि तो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.3 / 10प्रियंकाने या बिलबोर्डचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘महिलांची आवाज बनून ... सेलिब्रेशनमध्ये सामील झाल्याचा आनंद आहे. माझे पुस्तक ‘अनफिनिश्ड’ प्रकाशित होऊन एक महिना पूर्ण झाला आणि हा खास क्षण आहे,’ असे प्रियंकाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.4 / 10प्रियंकाच्या या उपलब्धीमुळे चाहतेही आनंदित आहेत. आमचा अभिमान, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.5 / 10अभिनेत्री प्रियांका चोप्राने लिहिलेले अनफिनिश्ड हे आत्मचरित्र महिनाभरापूर्वी प्रकाशित झाले. प्रकाशनानंतर अवघ्या 12 तासांमध्ये हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले होते.6 / 10 मिस वर्ल्ड होण्यापासून ते बॉलिवूडमधील तिचा प्रवास, स्ट्रगल, अफेअर्स, निकवरचे प्रेम आणि हॉलिवूडमधील तिची एण्ट्री या सगळ्यावर तिने या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. 7 / 10अनफिनिश्ड हे नाव तिने पुस्तक सुरुवात करण्याच्या आधीच ठरवले होते. या बद्दल सांगताना ती म्हणाली होती, ‘गेली 20 वर्ष इंडस्ट्रीत काम करताना माझ्याकडे एक भली मोठी यादी तयार झाली होती. ही यादी मला वैयक्तिक आणि प्रोफेशनली या दोन्ही बाजूंनी तपासायची होती. आणि म्हणूनच मी अजूनही स्वत:ला अनफिनिश्ड (अपूर्ण) समजते. म्हणून या पुस्तकाचे नाव देखील अनफिनिश्ड आहे.’8 / 10बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. प्रियंकाने वयाच्या 17 व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे.9 / 10 मिस इंडिया ते बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ होण्याचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर प्रियंकाने हॉलिवूडमध्येही आपला अभिनयाची चुणूक दाखविली. 10 / 10आज ती इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनाससह लग्नगाठ बांधून प्रियंका अमेरिकेत स्थायिक झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications