हिरव्या साडीत खुललं 'देसी गर्ल'चं सौंदर्य; प्रियांकाच्या ग्लॅमरस अदांनी चाहते 'घायाळ' By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 1:28 PM1 / 9बॉलिवूडची देसी गर्ल ते ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियंका चोप्राने बॉलिवूड नंतर हॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. 2 / 9प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक मोठे प्रोजेक्ट करत आहे. हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून ती क्वचितच भारतात येते.3 / 9मामी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी नुकतेच प्रियंका मुंबईत आली होती. या टूरमध्ये तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. 4 / 9मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जिओ वर्ल्ड प्लाझा शॉपिंग मॉलचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राही पोहचली होती. 5 / 9प्रियंका कायमच तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिच्या निखळ हास्याने ती सर्वांच्या मनात जागा निर्माण करते. यावेळी तिनं हिरव्या रंगाची साडी नेसली होती. 6 / 9प्रियांका चोप्राने यावेळी तिचे सुंदर काळे केस मोकळे सोडले होते आणि सिंपल मेकअप केला होता. यात प्रियांकाचा लुक खूपच युनिक आणि क्लासी वाटत होता.7 / 9प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसली. 'लव अगेन' या हॉलिवूड सिनेमातही तिने मुख्य भूमिका साकारली. 8 / 9आता ती आगामी 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू' या सिनेमात दिसणार आहे. 9 / 9तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाल्यास प्रियंका आणि निकने १ डिसेंबर, २०१८ रोजी दोघांनी जयपूरमध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून आता त्यांना मालती मेरी नावाची गोड मुलगीही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications