Join us

व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 2:42 PM

1 / 10
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख सोबत अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. त्याच्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली.
2 / 10
शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात शाहरुखविरुद्ध जॉन अब्राहमची निवड करण्यात आली. जॉनला एका अतिशय हटके अवतारात सादर करण्यात आलं आहे. स्क्रीनवर पठाणच्या विरुद्ध उभा असलेला जॉन शोभून दिसला.
3 / 10
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा टायगर-3 चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला. टायगर-3 या चित्रपटात इम्रान हाश्मी हा सलमानला टक्कर देताना दिसला. त्याने आयएसआय एजंट आतिश फतेह कादरीची भूमिका साकारली.
4 / 10
रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमात बॉबी (Bobby Deol) खलनायकाच्या भूमिकेत होता. केवळ 15 मिनीटांच्या भूमिकेने बॉबी देओलने (Bobby Deol) प्रेक्षकांची मने जिंकली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
5 / 10
प्रियंका चोप्रा ( Priyanka Chopra) आता ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या. प्रियंकांच्या नकारात्मक भूमिका म्हटल्यावर ‘ऐतराज’ (Aitraaz) हा सिनेमा लगेच डोळ्यांपुढे येतो. या चित्रपटात प्रियंकाने सोनियाची व्यक्तिरेखा साकारली होती. प्रियांकाला या व्यक्तिरेखेत पाहून सगळेच थक्क झाले होते.
6 / 10
सनी देओलचा ब्लॉकबस्टर ‘गदर 2’ या सिनेमाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. अभिनेता मनीष वाधवा यांनी पाकिस्तानी आर्मी जनरल भुमिका साकारली. त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला
7 / 10
सनी देओल आणि जुही चावला यांच्या डर सिनेमात चक्क शाहरुख खाननं खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. शाहरुख सिनेमात विलन होता पण त्यानं त्याची भूमिका इतकी उत्तम निभावली की प्रमुख कलाकारांऐवजी शाहरूखला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
8 / 10
'एक व्हिलन' या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकची भुमिका साकारली होती. राकेश नावाचं पात्र साकारताना रितेशने इतकं अप्रतिम काम केलं की प्रेक्षक आजही ते विसरलेले नाहीत.
9 / 10
रणवीर सिंगने यशराज प्रॉडक्शनमधून करिअरची सुरुवात केली होती. पद्मावत चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीच्या भूमिका साकारून अभिनेत्यानं चॉकलेट बॉय इमेज मोडली. ही नकारात्मक भूमिका करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
10 / 10
'रॉकी', 'साजन' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' यांसारख्या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीत उच्च उंची गाठणाऱ्या संजय दत्तने नकारात्मक पात्र साकारून प्रशंसाही मिळवली आहे. 'केजीएफ' मधील अधीरा ही भुमिका संजय दत्त साकरली होती.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीप्रियंका चोप्राशाहरुख खानरितेश देशमुखसंजय दत्तबॉबी देओलइमरान हाश्मीरणवीर सिंगजॉन अब्राहम