Join us  

प्रियंका चोप्राची जाऊबाई दिसते तिच्याइतकीच सुंदर, तीदेखील आहे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 4:01 PM

1 / 9
प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत बरीच ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असते. 2018 मध्ये प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
प्रियंका सारखीच निक जोनासच्या मोठ्या भावाची बायकोही अभिनेत्री आहे. भारतातील लोक तिला प्रियंका चोप्राची जाऊबाई म्हणून ओळखंत असले तरी पण सोफीची स्वतःची ओळख आहे. ती हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
21 फेब्रुवारी 1996 रोजी नॉर्थम्प्टन, इंग्लंडमध्ये जन्मलेल्या सोफी टर्नरला गेम ऑफ थ्रोन्समधून प्रसिद्धी मिळाली. यामध्ये तिने सांसा स्टार्कची भूमिका साकारली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
याआधी सोफी X-Man Apocalypse, Dark Phoenix R Survive मध्ये देखील दिसली आहे. जगभरात त्यांच्या अभिनयाचा चाहता वर्ग आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
2016 मध्ये सोफीने प्रसिद्ध अमेरिकन गायक जो जोनासला डेट करायला सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सोफी आणि जो जोनास यांनी एकमेकांशी दोनदा लग्न केले होते. पहिले लग्न 1 मे 2019 रोजी लास वेगासमध्ये झाले होते, तर जून 2019 मध्ये त्यांनी पुन्हा लग्न केले.(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
जुलै 2020 मध्ये, सोफी पहिल्यांदा आई झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर जुलै 2022 मध्ये तिला दुसरी मुलगी झाली. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
सोफी ही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'साठी सोफीला तीन पुरस्कारही मिळाले आहेत.
9 / 9
सोफी सौंदर्याच्या बाबतीत प्रियंकालाही टक्कर देते. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूडनिक जोनास