Join us

'तुला एक लाख देतो अमिताभला काढून टाक'; जी.पी. सिप्पींनी दिली होती दिग्दर्शकांना लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 8:57 AM

1 / 8
'सात हिंदुस्तानी' या सिनेमातून अमिताभ बच्चन यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. या सिनेमानंतर त्यांचं करिअर जवळपास फ्लॉप झालं होतं. कोणीही त्यांच्यासोबत काम करायला तयार नव्हतं.
2 / 8
या सिनेमानंतर तब्बल ४ वर्षांनी त्यांना अअसा एक सिनेमा मिळाला ज्यामुळे त्यांचं करिअर सावरलं गेलं. विशेष म्हणजे त्यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. पण, पुन्हा रिलीज झाल्यावर तो सुपरहिट ठरला.
3 / 8
हा सिनेमा होता बंधे हाथ (bandhe haath). हा सिनेमा १९७३ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाच्या यशामुळे बिग बींना जंजीर हा सिनेमा मिळाला.
4 / 8
हा सिनेमा होता बंधे हाथ (bandhe haath). हा सिनेमा १९७३ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाच्या यशामुळे बिग बींना जंजीर हा सिनेमा मिळाला.
5 / 8
आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, बंधे हाथ हा सिनेमा जंजीरपूर्वी १९७३ मध्ये रिलीज झाला होता. पण, त्याचे राईट्स कोणी खरेदी करत नव्हते. इतकंच नाही तर या सिनेमाचं आर. के. स्टुडिओमध्ये शुटिंग सुरु होतं यावेळी जी.पी. सिप्पी यांनी सिनेमाचे दिग्दर्शक ओ.पी.आर.रलहन यांची भेट घेतली आणि अमिताभला या सिनेमातून काढ असं सांगितलं.
6 / 8
'तू याला (अमिताभ) या सिनेमातून काढून टाक आणि दुसऱ्या एखाद्या अभिनेत्याला घे. जर तू माझं म्हणणं ऐकलं तर मी तुला १ लाख रुपये देईन', अशी ऑफर जी.पी. सिप्पी यांनी रलहन यांना दिली होती. परंतु, रलहन यांनी ही ऑफर रिजेक्ट केली आणि त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.
7 / 8
जर आपण असं केलं तर त्याचा परिणाम आपल्या प्रतिष्ठेवर होईल असा विचार रलहन यांनी केला आणि जी.पी.सिप्पीची ऑफर धुडकावली. परंतु, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जो अंदाज लावण्यात आला होता तोच खरा ठरला आणि हा सिनेमा फ्लॉप झाला.
8 / 8
रिपोर्टनुसार, जेव्हा बिग बींचा जंजीर रिलीज झाला आणि तो सुपरहिट ठरला त्यावेळी पुन्हा एकदा बंधे हाथ हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आणि विशेष म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला.
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा