Join us  

अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 4:07 PM

1 / 7
साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) सिनेमा 'पुष्पा' (Pushpa) अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. पुष्पातील अल्लू अर्जुनच्या कामाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, अल्लू अर्जुन या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची एन्ट्री होण्याआधी ६ कलाकारांनी हा सिनेमा नाकारला होता. पण आता त्यांना सिनेमाचं यश पाहून नक्कीच पश्चाताप होत असेल.
2 / 7
महेश बाबू (Mahesh Babu) - अल्लू अर्जुनआधी दिग्दर्शक सुकुमार या सिनेमाची ऑफर घेऊन टॉलिवूड प्रिन्स म्हटला जाणाऱ्या महेश बाबूकडे गेला होता. पण त्यावेळी महेश बाबू हा सिनेमा नाकारला. महेश बाबूला सिनेमाची कथा आवडली होती. पण त्याला वाटलं की, या सिनेमातील भूमिका त्याच्या इमेजच्या विरूद्ध आहे. सोबतच त्याला ग्रे शेडच्या भूमिका करणं आवडत नाही. यामुळे महेश बाबूने हा सिनेमा नाकारला.
3 / 7
सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) - तुम्ही विचार करत असाल की, या लिस्टमध्ये समांथा रूथ प्रभुचं नाव का आहे? कारण ती तर या सिनेमात डान्स नंबर करताना दिसली आहे. मात्र, दिग्दर्शक समांथा रूथ प्रभुला या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी ऑफर दिली होती. समांथा रूथ आणि अल्लू अर्जुन एक हिट जोडी आहे. त्यामुळे त्यांना घेतलं जाणार होतं. पण त्यावेळी सिनेमांपासून शाॉर्ट ब्रेक घेणार असल्याचं सांगत तिने हा सिनेमा नाकारला होता.
4 / 7
दिशा पटनी (Disha Patani) - अल्लू अर्जुनचा सिनेमा पुष्पामध्ये आधी अभिनेत्री दिशा पटनीची एन्ट्री होणार होती. तिला या सिनेमात एक डान्स नंबर करण्यासाठी अॅप्रोच करण्यात आलं होतं. तिने त्यावेळी सिनेमात डान्स नंबर करण्यासाठी १.५ कोटी रूपये इतकी मोठी रक्कम मागितली होती. नंतर मेकर्सनी सामंथाला डान्स नंबर दिला. आश्चर्याची बाब म्हणजे या डान्स नंबरसाठी सामंथाने ५ कोटी रूपये घेतल्याची चर्चा आहे.
5 / 7
नोरा फतेही (Nora Fatehi) - 'पुष्पा' हा एक पॅन इंडिया सिनेमा असल्याने या डान्स नंबर करण्यासाठी मेकर्सनी बॉलिवूडची नंबर वन डान्सर नोरा फतेहीला कॉन्टॅक्ट केला होता. पण कथितपणे नोराने रक्कम जास्त मागितल्याने मेकर्सनी दुसरा पर्याय निवडला.
6 / 7
विजय सेतुपति (Vijay Sethupathi) - तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतिला मेकर्सनी अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमात मुख्य व्हिलनची ऑफर केली होती. 'मास्टर'मधील विजयचं काम पाहून मेकर्सनी त्याला ही ऑफर दिली होती. पण तो आधीच वेगवेगळ्या सिनेमांमध्ये बिझी असल्याने त्याना पुष्पा सिनेमा नाकारला. नंतर ही भूमिका फहाद फासिलने केली.
7 / 7
नारा रोहित (Nara Rohit) - तेलुगू स्टार नारा रोहितला सिनेमाच्या मेकर्सनी सिनेमातील व्हिलनच्या रोलसाठी कॉन्टॅक्ट केला होता. नारा रोहितने व्हिलनची भूमिका करण्यास नकार दिला.
टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनमहेश बाबूरश्मिका मंदानासमांथा अक्कीनेनी