Join us  

'पुष्पा'राजच्या रिअल लाइफ श्रीवल्लीला कधी पाहिलंय का? सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींवरही करते मात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 1:54 PM

1 / 11
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाने अल्पावधीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
2 / 11
तेलुगू, तामिळ, हिंदी या अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून पुष्पाराज (अल्लू अर्जुन) आणि श्रीवल्ली ( रश्मिका मंदाना) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
3 / 11
या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. परंतु, पुष्पाची रिअल लाइफ श्रीवल्लीदेखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही.
4 / 11
पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अल्लू अर्जुनची रिअल लाइफ श्रीवल्ली कशी दिसते ही एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीचे काही खास फोटो पाहुयात.
5 / 11
अल्लू अर्जुनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) असं असून ती प्रचंड सुंदर दिसते.
6 / 11
६ मार्च २०१६ मध्ये अल्लू अर्जुन आणि स्नेहाने हैदराबादमध्ये मोठ्या थाटात लग्न केलं.
7 / 11
अल्लू अर्जुन आणि स्नेहाला दोन लहान मुलंदेखील आहेत.
8 / 11
स्नेहा उच्चशिक्षित असून तिने कंम्प्युटर साइन्समध्ये डिग्री घेतली आहेत. स्नेहाने अमेरिकेमध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
9 / 11
स्नेहाचे वडील हैदराबादमधील प्रसिद्ध उद्योजक असल्याचं सांगण्यात येतं. स्नेहा आणि अल्लू अर्जुनची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती.
10 / 11
स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
11 / 11
अल्लू अर्जुनसोबतचा एक सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीरश्मिका मंदानाTollywoodबॉलिवूडसिनेमा