Prajakta Mali : आता मी काय करू यांचं? 'रानबाजार' नंतरच्या त्या अफवेमुळे प्राजक्ता माळी वैतागली By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 2:19 PM1 / 9मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. प्राजक्ताने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. पण सर्वाधिक चर्चा झाली ती तिच्या 'रानबाजार' या वेबसीरिजची.2 / 9होय, सोज्वळ प्राजक्ता या सीरिजमध्ये कधी नव्हे इतक्या बोल्ड रूपात दिसली. या सीरिजमध्ये तिने साकारलेली रत्ना पाहून सगळेच थक्क झालेत. यावरून तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.3 / 9'रानबाजार'च्या निमित्ताने प्राजक्ताला बरीच टीका सहन करावी लागली. या सीरिजच्या निमित्ताने पसरलेली एक अफवा तर अद्यापही तिचा पिच्छा सोडायला तयार नाही.4 / 9होय, सोशल मीडियावर तिच्याबद्दलची एक अफवा अजूनही फिरताना दिसतेय. आता प्राजक्ताही या अफवेला वैतागली आहे. एका ताज्या मुलाखतीत ती यावर बोलली.5 / 9प्राजक्ता नुकतीच प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात दिसली. या कार्यक्रमात प्राजक्ता भरभरून बोली. तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट अफवेबद्दलही तिने सांगितलं. 6 / 9ती म्हणाली, 'प्राजक्ता माळी गुटखा खाते असं आजही काही ठिकाणी वाचायला मिळतंय. परवाच मी एक बातमी वाचली. म्हणून प्राजक्ता माळी खाते गुटखा, असा मथळा होता आणि याबद्दलचे प्रश्न मला आजही विचारले जातात.7 / 9ती म्हणाली, 'रानबाझार' मध्ये मला गुटखा खाताना दाखवलीये. त्यानंतर प्राजक्ता माळी खाते गुटखा अशा मथळ्याच्या बातम्या वाचायला मिळताहेत. आतमध्ये लिहिलेलं की ती बडीशेप होती. रानबाजारचा सीन होता. अरे पण वर मथळ्यात मी गुटखा खाते लिहिलंय ना तुम्ही...8 / 9गुटखा वाली बातमी खूप वाईट आहे. फार चुकीची आहे. अगं हे काय, म्हणून अनेकांनी मला चक्क मॅसेज केलेले. आता मी काय करू यांचं? त्यांच्यावर पोलिस केस करू का? त्यावर नको जाऊ देत, असे ते म्हणाले.9 / 9'रानबाझार' मध्ये भूमिकेची गरज म्हणून ती गुटखा खाताना दाखवण्यात आली आहे. मात्र त्या पुडीत गुटखा नव्हे तर बडीशेप होती, हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. पण तरीही अशा बातम्या वाचायला मिळतात. हे चुकीचं आहे, असंही ती म्हणाली. आणखी वाचा Subscribe to Notifications