Join us

Karisma Kapoor: ऐश्वर्याने नाकारला आणि करिश्माला मिळाला, याच सिनेमानं ‘लोलाे‘ला बनवलं सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 1:47 PM

1 / 10
१९९६ मध्ये रिलीज झालेल्या राजा हिंदुस्तानी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. करिश्मा कपूर आणि आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा बजेट होता फक्त ५.७५ कोटी रूपये. पावणे सहा कोटींच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सुमारे ७६.३४ कोटींची कमाई केली होती.
2 / 10
प्रेम कैदी, अनाडी, राजा बाबू, कुली नंबर १, साजन चले ससुराल, जीत अशा चित्रपटानंतर करिश्मा कपूरच्या हाती राजा हिंदुस्तानी हा सिनेमा लागला आणि सगळंच बदललं. कारण याआधी करिश्माला नोटीस करण्यापेक्षा तिची खिल्लीच अधिक उडवली जायची.
3 / 10
करिअरच्या सुरूवातीला लोलोच्या लुकवरून तिची बरीच खिल्ली उडवली गेली. अगदी तिला लेडी रणधीर म्हणून हिणवलं गेलं. पण राजा हिंदुस्तानी आला आणि करिश्मा कपूरकडे पाहण्याची चाहत्यांची नजरच बदलली. खरं तर याचं श्रेय ऐश्वर्याला द्यायला हवं.
4 / 10
होय, कारण ऐश्वर्याने नाकारला नसता तर कदाचित लोलोला राजा हिंदुस्तानी मिळाला नसता. मीडिया रिपोर्टनुसार, राजा हिंदुस्तानी हा सिनेमा सर्वप्रथम ऐश्वर्याला ऑफर झाला होता. पण तिला तेव्हा शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. म्हणून तिने हा सिनेमा नाकारला.
5 / 10
ऐश्वर्याने राजा हिंदुस्तानी नाकारला आणि तो करिश्मा कपूरच्या झोळीत पडला. या सिनेमानं लोलोला खरी ओळख दिली. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. या सिनेमानंतर करिश्मानं कधीच मागे वळून पाहिलं नाही.
6 / 10
राजा हिंदुस्तानी हिट होण्यामागे बरीच कारणं असली तरी सिनेमातल्या किसिंग सीननेही धुमाकूळ घातला होता. एका सीनमुळे सिनेमाची बरीच चर्चा झाली होती.
7 / 10
सिनेमापेक्षा करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्या किसिंग सीनचीच जास्त चर्चा रंगायची. रुपेरी पडद्यावर सीन अगदी छोटा असला तरी या एका सीनसाठी तब्बल तीन दिवस लागले होते.
8 / 10
करिश्मा आणि आमिर दोघेही या सीनसाठी कंम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे वारंवार रिटेक्स वर रिटेक्स व्हायचे. हा सीन शूट करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा करिश्माचा थरकाप उडाला होता.
9 / 10
सीन सुरु असताना करिश्मा थरथर कापत होती. कारण शूटींग ऊटीमध्ये होतं.संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हा सीन शूट करण्यात आला होता. त्यात फेब्रुवारी महिना, भयंकर थंडी होती. इतक्या थंडीत करिश्माने कसाबसा हा सीन दिला होता.
10 / 10
करिश्माने वयाच्या १७ व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९९१ मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. त्यानंतर एकावर एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
टॅग्स :करिश्मा कपूरऐश्वर्या राय बच्चन