Join us

दीवार ते नमक हलाल! बिग बींच्या 'या' सिनेमांच्या तमिळ रिमेकमध्ये झळकलेत रजनीकांत; पाहा चित्रपटांची लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 2:30 PM

1 / 10
'थलायवा' या नावाने विशेष ओळखले जाणारे दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. आजवरच्या कारकिर्दीत रजनीकांत यांनी अनेक सुपरिहट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आज त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
2 / 10
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावणाऱ्या रजनीकांत यांनी काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. परंतु, आज आपण रजनीकांत यांनी कोणत्या बॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम केलंय ते जाणून घेऊयात.
3 / 10
अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यात चांगली मैत्री आहे. विशेष म्हणजे बिग बींच्या जवळपास 7 चित्रपटांच्या तमिळ रिमेकमध्ये रजनीकांत यांनी काम केलं आहे.
4 / 10
डॉन - १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या डॉन या सुपरहिट चित्रपटाचा तमिळमध्ये रिमेक करण्यात आला होता. बिल्ला असं या चित्रपटाचं नाव होतं. यात डॉनमधील अनेक सीन आहेत तसेच कॉपी करण्यात आले होते.
5 / 10
नमक हलाल - 1982 मध्ये प्रकाश मेहरा यांनी नमक हलाल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जवळपास ५ वर्षांनी या चित्रपटाचा 'वेलाइकरण' हा तमिळ रिमेक आला.
6 / 10
दीवार - दीवार या चित्रपटाच्या यशानंतर ६ वर्षांनी 'थी' हा तमिळ रिमेक करण्यात आला. या चित्रपटातही दीवारप्रमाणेच अनेक सीन कॉपी करण्यात आले होते.
7 / 10
खुद्दार - अमिताभ, परवीन बॉबी, विनोद मेहरा, संजीव कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांचा खुद्दार हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता. त्यामुळेच या चित्रपटाची तमिळ रिमेक करण्यात आला. 'पादिक्कड़वन' असं या चित्रपटाचं नाव होतं.
8 / 10
मर्द - 1985 मध्ये मनमोहन देसाई यांनी मर्द हा चित्रपट तयार केला होता. त्यानंतर 1986 मध्ये याचा तमिळ रिमेक करण्यात आला. 'मावीरन' असं या रिमेकचं नाव होतं. यात रजनीकांत यांनी एका टांगेवाल्याची भूमिका साकारली होती.
9 / 10
लावारिस - प्रकाश मेहरा यांच्या लावारिस चित्रपटाचा 'पनाक्करण' या नावाने तमिळ रिमेक करण्यात आला होता. यात रजनीकांत आणि गौतमी मुख्य भूमिकेत झळकले होते.
10 / 10
खून-पसीना - 1977 मध्ये गाजलेल्या या चित्रपटाचा 1989 मध्ये तमिळ रिमेक करण्यात आला होता. 'सिवा' असं या चित्रपटाचं नाव होतं.
टॅग्स :अमिताभ बच्चनरजनीकांतबॉलिवूडTollywoodसिनेमा