Join us

मुलीला जन्म देताच पहिल्या पत्नीचं निधन, ९ वर्षांनी लहान राधाशी केलं दुसरं लग्न; राजपाल यादवची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:49 AM

1 / 10
बॉलिवुड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या छोटा पंडितची रिअल लाईफ कहाणी खूपच वेगळी आहे. आज राजपाल ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 10
राजपालने केवळ विनोदीच नाही तर इतरही अनेक भूमिका केल्या आहेत. बॉलिवुडमध्ये यश मिळवण्यासाठी त्यानेही बराच स्ट्रगल केला आहे. हे यश मिळवणं सोपं नव्हतं. तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्याने मोठ्या दु:खाचा सामना केला आहे.
3 / 10
राजपाल यादवचा जन्म १६ मार्च १९७१ रोजी उत्तर प्रदेशच्या कुद्रा येथे झाला. त्याला लहानपणापासूनच फिल्मी जग आकर्षित करत होते. फिल्ममध्ये येण्यापूर्वी राजपालने दूरदर्शनच्या एका मालिकेत काम केले होते. यानंतर १९९९ मध्ये त्याने 'दिल क्या करे','शूल','मस्त' या सिनेमात काम केले.
4 / 10
राजपालने करिअरच्या सुरुवातीला वेगवेगळ्या भूमिका केल्या. २००० सालानंतर त्याच्या फिल्मी करिअरने वेग पकडला. 'हंगामा','चुप चुप के','भूलभुलैय्या','ढोल','फिर हेरा फेरी' या विनोदी सिनेमांत भूमिका केल्या. या सिनेमांनी त्याला खरी ओळख दिली.
5 / 10
राजपालच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर १९९२ मध्ये करुणासोबत त्याचे लग्न झाले होते. मात्र पहिल्या मुलाच्या जन्मानंतर काही कॉम्प्लिकेशन्समुळे पत्नीचे निधन झाले. यामुळे राजपाल पुरता खचून गेला होता. त्याच्या पहिल्या मुलीचे नाव ज्योती आहे.
6 / 10
नंतर २००३ मध्ये राजपाल ९ वर्ष लहान राधासोबत लग्नबंधनात अडकला. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपालला दुसरे लग्न करायचे नव्हते. मात्र जेव्हा तो राधाला भेटला तेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. राधा कॅनडाची आहे मात्र राजपालच्या प्रेमात ती कॅनडा सोडून कायमची मुंबईत आली.
7 / 10
कॅनडामध्ये राजपाल आणि राधाची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. राजपाल जवळपास १० दिवस कॅनडात राहिला होता. नंतर दोघंही सतत फोनवर संपर्कात असायचे. दरम्यान २००३ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
8 / 10
राधाने लग्नानंतर दोन मुलींना जन्म दिला. दोघींवरही त्याचं खूप प्रेम आहे. एकीचं नाव हर्षिता तर दुसरीचं नाव रेहांशी आहे. राजपाल दोन्ही लेकींबरोबरचे फोटो नेहमी शेअर करत असतो.
9 / 10
तर राजपालची पहिली मुलगी ज्योती हिचं लग्न झालं आहे. २०१७ मध्येच संदीप यादवसह तिने लग्नगाठ बांधली. राधाचे ज्योतीसोबतही चांगले नाते आहे हे अनेकदा त्यांच्या फोटोंमधून दिसते.
10 / 10
राजपाल आणि राधा आजही एकमेकांच्या तितकेच प्रेमात आहेत. आज राजपालच्या वाढदिवशी राधाने सोशल मीडियावर एक गोड फोटो पोस्ट करत पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
टॅग्स :राजपाल यादवपरिवारव्हायरल फोटोज्