Join us

राजू श्रीवास्तव यांची मुलगी आहे राष्ट्रीय वीरता पुरस्कार विजेती! जाणून घ्या तिच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 3:57 PM

1 / 9
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं आज निधन झालं.वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
गेली ४० दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती मुलगी अंतरा देत होती. माझे पप्पा लवकर बरे होतील, असा विश्वास तिला होता. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
राजू श्रीवास्तव यांची लेक अंतरा ही सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. अ‍ॅक्टिंगपासून अनेक प्रोड्यूसर, डायरेक्टरसोबत तिने काम केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
रिपोर्टनुसार, अंतरा 28 वर्षांची आहे. तिचं अद्याप लग्न झालेलं नाही. मुंबईच्या ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण झालं. यानंतर मुंबईच्या एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्समधून तिने मास मीडिया इन अ‍ॅडव्हरटायजिंगची पदवी घेतली. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
2006 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. तिने घरात शिरलेल्या दोन चोरांपासून आपल्या आईला वाचवलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
या घटनेबद्दल अंतराने एका मुलाखतीत सांगितलं होतं, त्या चोरांजवळ बंदूक होती. मी आईला त्यांच्यापासून वाचवलं. मी बेडरूममध्ये गेले आणि पप्पा व पोलिसांना मदत मागितली. नंतर खिडकीतून बिल्डिंगच्या चौकीदाराला आवाज दिला. चौकीदार व पोलिसांनी माझ्या आईला चोरांपासून वाचवलं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
अंतराने 2013 साली फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंटमध्ये असिस्टंट प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून काम करायला सुरूवात केली. मॅक प्रॉडक्शनसाठीही तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
असिस्टंट प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून तिने फुल्लू, पलटन, द जॉब, पटाखा, स्पीड डायल अशा अनेक चित्रपटांसाठी काम केलं. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
अंतराने 2018 साली ‘वोडका डायरिज’मधून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. यात तिने काव्याची भूमिका साकारली होती. तिला भटकंती खूप आवडते. ती सोशल मीडियावर ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :राजू श्रीवास्तवसेलिब्रिटी