Join us

Rakhi Sawant : "माझं घर तोडलं, मी रस्त्यावर आली", राखी सावंतचा नवा 'ड्रामा'; आदिलवर केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:22 AM

1 / 12
'मैं हूं ना' आणि 'मस्ती' सारख्या चित्रपटात काम केलेली राखी सावंत सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानीला तुरुंगात पाठवल्यामुळे चर्चेत आहे. ती रोज नवऱ्यावर गंभीर आरोप करत नवनवे खुलासे करत आहे. आता अभिनेत्रीने आदिलने तिच्याकडून तिचं घरही हिसकावलं असल्याचं सांगितले आहे.
2 / 12
अलीकडेच राखी सावंतला पापाराझींसोबत बोलताना रडू कोसळलं आहे. आदिलने आपलं घर तोडल्याचं म्हटलं आहे. पापाराझीसमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताता तिने आदिलने पैसे लुटल्याचं सांगितलं. यानंतर अचानक तिला चक्कर येऊ लागली आणि ती तिथेच बसली.
3 / 12
राखीला पाणी देण्यात आले. रडत रडत राखीने आदिलवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलीबद्दल सांगितले. राखी म्हणाली, 'आज त्या मुलीचे ऑडिओ-व्हिडीओ आले आहेत. हे देवा, माझ्यावर दया कर.' म्हैसूर पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतल्याचेही राखीने सांगितले.
4 / 12
राखीला विचारण्यात आले की, म्हैसूरमध्ये त्याच्यावर किती खटले सुरू आहेत. यावर राखी म्हणाली, त्या मुलीचे आरोप खरे आहेत. तिने मला झालेल्या संभाषणाचा ऑडिओ शेअर केल्यावर तो त्या मुलीला मारायला गेला.
5 / 12
आदिलने घर तोडल्याचं राखीचे म्हणणं आहे. अभिनेत्री म्हणाली, 'माझे घर तुटलं. राखी सावंतला रस्त्यावर आणलं.' ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल रोज खुलासे करत आहे. तिचा पती आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात आहे. राखी स्वतःला न्याय देण्याची मागणी करत आहे
6 / 12
जेव्हा राखीला विचारण्यात आले की ती आदिलबद्दल इतकी डेस्पेरेट का आहे? यावर रडत रडत राखी म्हणते, 'मी डेस्पेरेट नाही. मी विचार करतेय की तो माझ्यासारख्या कणखर मुलीला कसा फसवू शकतो. माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 12
राखीने आता तिच्या गर्भपाताचे दुःख व्यक्त केलं आहे. आपला मुद्दा सांगताना ती भावूक होते. बिग बॉस मराठीत असताना राखीने ती गरोदर असल्याचा खुलासा केला होता. काही काळानंतर तिचा गर्भपात झाला पण आदिलला तिच्याबद्दल सहानुभूती नव्हती.
8 / 12
'इन्स्टंट बॉलिवूड'शी बोलताना राखी सावंत म्हणाली, 'माझे ऑपरेशन खूप मोठे होते. बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यानंतर माझा गर्भपात झाला. त्याने (आदिल खान दुर्रानी) मला हे सर्व सांगण्यास मनाई केली होती.'
9 / 12
माझे डॉक्टर शिंदे यांनी त्यांना सांगितले होते की 'ऑपरेशननंतर तुम्ही 3 महिने काहीही करू शकत नाही परंतु 10 दिवस तो थांबू शकला नाही. आमच्यात ते सर्व काही घडलं. डॉक्टरने मला सांगितले की जर मला आता बाळ झाले तर भविष्यात तुम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागेल.'
10 / 12
'तुम्ही सुरक्षित राहणार नाही. तुमचा जीव धोक्यात आहे. बिग बॉस मराठीत पाहिलं तर मी प्रेग्नंट असल्याचं बिग बॉसला म्हटलं होतं. तुमच्याकडे ते फुटेज असेल तर मिळवा. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिल्यावर ब्लीडिंग सुरू झालं.'
11 / 12
राखीने व्हिडिओमध्ये ज्या ऑपरेशनचा उल्लेख केला आहे, त्याचा उल्लेख तिने यापूर्वीही केला होता. सप्टेंबर 2022 मध्ये, तिच्या गर्भाशयाच्या वर असलेल्या गाठीची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ती गरोदर राहिली. या महिन्याच्या सुरुवातीला राखीने आदिलविरोधात गुन्हा दाखल केला होता.
12 / 12
टॅग्स :राखी सावंत