Rakhi Sawant : राखी सावंत प्रेग्नेंट?; म्हणाली, "सिंगल मदर झाली तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत आदिलवर प्रेम करेन" By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:47 PM1 / 12'बिग बॉस' फेम राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच तिने दुसऱ्या लग्नाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. राखीने दावा केला आहे की, तिने सात महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केला आहे. तसेच हा निकाह देखील कायदेशीर करण्यात आला आहे. 2 / 12राखीने लग्नाचा दावा केलेला असताना आता आदिल मात्र या लग्नाला नकार देत आहे. तर दुसरीकडे राखीने असं काही म्हटलं की ज्यामुळे ती प्रेग्नेंट असावी असा अंदाज लोकांनी लावला आहे. 'सिंगल मदर असूनही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आदिलवर प्रेम करेन' असं तिने म्हटलं आहे. 3 / 12राखी सावंतने एका लेटेस्ट मुलाखतीत प्रेग्नेंसी आणि सिंगल मदर असण्याबद्दल सांगितले आहे. नवभारत टाइम्सशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'मी आदिलसोबतच्या लग्नामुळे खूप खूश आहे. कळत नाही तो हे सर्व का नाकारतोय? त्याच्या नकाराने मला खूप मोठा धक्का बसला आहे.'4 / 12'या लग्नाचे सत्य जगासमोर आणण्यासाठी मी त्याला गेल्या 7 महिन्यांपासून सांगत होती. मी एक सेलिब्रिटी आहे आणि माझ्या आयुष्याशी संबंधित गोष्टी लपवल्या जाऊ शकत नाहीत. कदाचित मी गरोदर राहीन किंवा काहीही होईल' असं देखील राखीने म्हटलं आहे. त्यामुळेच तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. 5 / 12केवळ प्रेग्नेंसीच नाही तर राखी सावंत सिंगल पॅरेंटिंगबद्दलही बोलली आहे. अभिनेत्रीने प्रेग्नेंसीबद्दल अधिक काही बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावर ती सध्या काही बोलू इच्छित नसल्याचे तिने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राखी खूप चर्चेत आहे. 6 / 12अभिनेत्री म्हणाली, “लग्नाचा खुलासा करणे खूप महत्त्वाचे झाले होते. हे लोकांसमोर आले नसते तर खूप त्रास झाला असता.' राखीने म्हटलं की ती खूप घाबरली आहे, त्यामुळे तिच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ती सिंगल मदर झाली तरी आदिलवर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील, असेही राखीने सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 12राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. मी व आदिल आम्ही सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं होत, मात्र आदिलने माझ्यावर हे लग्न लपवण्यासाठी दबाव टाकला. 'निकाह'सोबत आम्ही कोर्ट मॅरेजही केलं, मात्र आत्तापर्यंत हे सगळं जगापासून लपवून ठेवलं होतं, असा खुलासा केला आहे. 8 / 12आदिलसोबत निकाह केल्यानंतर राखीने फातिमा असं नामकरण केलं आहे. पण आता आदिलने राखीसोबत बोलणं थांबवलं आहे. आदिलने मला धोका दिल्याचं राखी म्हणत आहे. राखीने लग्न केल्याची बातमी येताच, अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. पण यानंतर एका मुलाखतीत राखीने वेगळंच काही सांगितलं. 9 / 12ती म्हणाली, 'आदिलने मला धोका दिला आहे. त्याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे. लग्नानंतरही तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आदिलचं हे वागणं पाहूनच मी लग्नाबद्दल अख्ख्या जगाला सांगितलं. लग्नानंतर मी माझं नावही बदललं आहे. निकाहनंतर मी माझं नाव फातिमा ठेवलं आहे.'10 / 12'लग्नाबद्दल लोकांना कळताच आता आदिल माझ्याशी बोलत नाहीये. त्याच्या व त्याच्या कुटुंबाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे'. पुढे ती म्हणाली, बहिणीचं लग्न होईपर्यंत आपलं लग्न लपवून ठेव, असं आदिल मला म्हणाला होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी ‘बिग बॉस मराठी 4 ’ मध्ये गेल्यावर बाहेर अनेक गोष्टी घडल्या. मग मात्र माझा संयम संपला आणि मी लग्नाबद्दल खुलासा केला.11 / 12राखी अलीकडे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. घरातील टॉप 5 सदस्यांमध्ये राखीने स्थान मिळवलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच राखी व तिचा बॉयफ्रेंड आदिल खानच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. 12 / 12राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या फोटोंमधील मॅरेज सर्टफिकेटवर 29 मे 2022 अशी लग्नाची तारीख आहे. त्यामुळे राखीने सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications