Rakhi Sawant : आदिल जेलमधून बाहेर येताच राखी सावंत घेणार तलाक; म्हणाली, "नरकासारखं आयुष्य नको"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:06 PM2023-03-31T12:06:43+5:302023-03-31T12:33:23+5:30

Rakhi Sawant : राखी सावंतने महिनाभरापूर्वी सांगितले होते की, तिला आदिलला शिक्षा झालेली पाहायची आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आरोपांमुळे तिचा पती आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात रात्र काढत आहे. अभिनेत्रीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. सध्या राखी पूर्णपणे इस्लाम धर्माचे पालन करत आहे. तिने रमजान महिन्यात रोजा ठेवण्यास सुरू केले आहेत. ती 5 वेळा नमाज पडते.

मीडियाशी संवाद साधताना राखीने हे सांगितलं आहे. आता अशाच एका मुलाखतीत ती म्हणाली की तिला आदिलपासून तलाक हवा आहे. तर यापूर्वीही तिने आरडाओरडा करत काहीही झाले तरी हरकत नाही असं म्हटलं होतं. ती असं करणार नाही. ती तिच्या पतीला सोडणार नाही असंही सांगितलं

'बॉम्बे टाइम्स'शी खास संवाद साधताना राखी सावंतने महिनाभरापूर्वी सांगितले होते की, तिला आदिलला शिक्षा झालेली पाहायची आहे. 6 फेब्रुवारी रोजी राखीने कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, पैसे आणि दागिन्यांची चोरी असे आरोप केले होते आणि आदिल खान दुर्रानी यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता.

12 फेब्रुवारीला एका इराणी महिलेने म्हैसूर पोलीस ठाण्यात आदिलवर बलात्काराचा आरोप करत एफआयआर दाखल केला. आता राखी सावंतने घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, "हो मी आधी सांगितले होते की, मला आदिलपासून घटस्फोट घ्यायचा नाही कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते."

"मला शिवीगाळ केली तेव्हाही. मला अडचणीत आणले तो माझ्याशी भांडला तेव्हाही. तरीही मला तलाक नको होता. त्याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो मला तलाक देईल, असे तो सांगत होता. पण तलाकचा विचार कधीच केला नाही."

"आता महिनाभर अविवाहित राहिल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे की, या पुरुषाशी विवाहित नात्यात राहण्यात काही अर्थ नाही. जो माझा अजिबात आदर करत नाही. तो तुरुंगात आहे आणि आता तो मला तलाक देऊ शकत नाही."

'आदिल खान तुरुंगातून बाहेर येताच एक दिवस मी तलाक देईन. मला आता मुक्त व्हायचे आहे आणि शांत जीवन जगायचे आहे." राखी सावंतने प्रसिद्धीसाठी मीडियात विधान केल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

"प्रत्येकजण या परिस्थितीतून गेला आहे का? ज्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारच्या वैवाहिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, देव त्यांचे रक्षण करतो? हा पब्लिसिटी स्टंट कसा असू शकतो? आधी मी तलाक घेईन असे वाटले नव्हते पण आता देईन."

राखी सावंत म्हणाली की तिला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणते- मला माझ्या कामावर आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्या रमजानमध्ये मला शांतता वाटते. मी आता थोडी निवांत आहे आणि पूर्वीसारखे नरकासारखं जीवन जगणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.