Rakul Preet Singh tests positive for COVID-19 amid shoot
रकुल प्रीत सिंगच्या या पोस्टमुळे उडाली खळबळ, सोशल मीडियाद्वारे दिली ही माहिती By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:50 PM2020-12-23T16:50:31+5:302020-12-23T16:50:31+5:30Join usJoin usNext बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला कोरोनाची लागण झाली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगितले आहे. रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे की, मला कोरोनाची लागण झाली असून माझी प्रकृती चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी... रकुल प्रीत सिंगने स्वतःला क्वारंटाईन केले असून ती नुकतीच व्हेकेशनवरून परतली होती. रकुल प्रीत सिंग मालदिवला व्हेकेशनला गेली होती. तिथले फोटो देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रकुल प्रीत सिंगने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. वरुण धवन, नीतू कपूर, कृति सेनन, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या सेलिब्रेटींना देखील कोरोनाची लागण झाली होती. रकुल प्रीत सिंगने दे दे प्यार दे, मरजावाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.टॅग्स :रकुल प्रीत सिंगRakul Preet Singh