निळ्या डोळ्यांची, एक काळ गाजवणारी मंदाकिनी 19 वर्षांनंतर पुन्हा परतणार...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 1:37 PM1 / 10 तिचे खरे नाव यास्मिन जोसेफ. आपण तिला ओळखतो ते मंदाकिनी या नावाने. होय, तीच ती 80 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. हीच मंदाकिनी आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी सज्ज झाली आहे.2 / 10वयाच्या 16 व्या वर्षी यास्मिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण या यास्मिनला खरी ओळख दिली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते.3 / 10‘राम तेरी गंगा मैली’नंतर मंदाकिनीचे कोट्यवधी फॅन्स होते. पण करिअर फार काळ चालले नाही. करिअरमध्ये 48 सिनेमे करणारी मंदाकिनी 2002 नंतर बॉलिवूडमधून गायब झाली. पण आता दोन दशकानंतर मंदाकिनीला पुन्हा बॉलिवूड खुणावू लागले आहे. तिचा मॅनेजर बाबूभाई थिबाने दिलेल्या माहितीनुसार, मंदाकिनी काही स्क्रिप्ट वाचते आहे. चित्रपट आणि वेबसीरिज दोन्हींमध्ये काम करण्यास ती तयार आहे. अर्थात मनाजोगी भूमिका मिळाली तर.4 / 10मंदाकिनीला तिच्या भावाने कमबॅकसाठी तयार केले. कोलकात्यात ती दुर्गा पूजेत सामील झाली होती. यावेळी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. म्हणजेच मंदाकिनीची क्रेज आजही कायम आहे. हे पाहून भावाने तिला चित्रपटात पुन्हा येण्यासाठी राजी केले.5 / 101985 मध्ये ‘अंतारेर भालोबाशा’ या बंगाली सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. याचवर्षी ‘मेरा साथी’ या सिनेमाद्वारे मंदाकिनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1985 मध्येच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. यातला पहिला म्हणजे आर पार आणि दुसरा म्हणजे, राम तेरी गंगा मैली . ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले.6 / 10बोल्ड अभिनेत्री म्हणून मंदाकिनी चर्चेत होतीच. पण याचदरम्यान मंदाकिनीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जुळले होते. दाऊदच्या नावानेही बॉलिवूडचा थरकाप उडायचा. त्यामुळे बरेच दिग्दर्शक मंदाकिनीसह काम करण्यास उत्सुक नव्हते.7 / 10एका मुलाखतीत मंदाकिनी यावर बोलली होती. 1994 मध्ये प्रकाशित दाऊदसोबतच्या त्या फोटोने माझे आयुष्य बदलून टाकले. माझा व दाऊदचा एक मुलगा आहे, असाही दावा केला गेला. पण यात काहीही तथ्य नाही. शोसाठी मी सर्रास दुबईला जायचे. अशाच एका शोमध्ये मी दाऊदला भेटले होते. पण आमच्यात काहीही नव्हते, असे ती म्हणाली होती.8 / 10दाऊदसोबत नाव आल्याने मंदाकिनीला सिनेमे मिळेनासे झालेत आणि तिला फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. 9 / 10सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. येथे ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. दलाई लामा यांना ती फॉलो करते. याशिवाय ती योगाही शिकवते. 10 / 101991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला. आणखी वाचा Subscribe to Notifications