PHOTOS : मंदाकिनीचा हँडसम मुलगाही करतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पाहा तर तो कसा दिसतो? By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:50 AM1 / 10तिचं खरं नाव यास्मिन जोसेफ. आपण तिला ओळखतो ते मंदाकिनी या नावानं. होय, तीच ती 80 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. हीच मंदाकिनी आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी सज्ज झाली आहे.2 / 10‘मां ओ मां’ नावाच्या गाण्यातून मंदाकिनी कमबॅक करतेय. विशेष म्हणजे या गाण्यात तिचा मुलगा रब्बील ठाकूर हाही दिसणार आहे. तो सुद्धा आईसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतोय.3 / 10 गेल्या 26 वर्षांपासून मंदाकिनी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होती. पण आता दिग्दर्शक साजन अग्रवालच्या म्युझिक व्हिडीओतून तिची वापसी होतेय. लेकासोबत ती दिसणार आहे. आता मंदाकिनीचा लेक रब्बील कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.4 / 101990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. दोघांना दोन मुलं झालीत. मुलगा रब्बील आणि मुलगी राब्जा इनाया. मंदाकिनीचे पती डॉ. ठाकूर 1970 -80 च्या दशकात मर्फी रेडियोच्या जाहिरातींमध्य चाईल्ड आर्टिस्ट म्हणून दिसले होते.5 / 10रब्बील हा मंदाकिनीचा मोठा मुलगा. लग्नानंतर मंदाकिनीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. रब्बीर हा सुद्धा हाच धर्म फॉलो करतो.6 / 10रब्बीलला लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत आहे. इन्स्टाग्रामवर तो आहे. पण इतर स्टारकिड्स सारखा फार काही अॅक्टिव्ह नाही. पण आईसोबतचे अनेक फोटो त्याने शेअर केले आहेत.7 / 10रब्बील हा विवाहित आहे. एप्रिल 2021 मध्ये त्याने त्याच्या बालमैत्रिणीशी लग्न केलं. लग्नाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या पत्नीचं नाव बुशरा आहे.8 / 10रब्बीलचा बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू होतोय म्हटल्यावर मंदाकिनी खूश्श आहे. आपल्या लेकाला बॉलिवूडमध्ये आणखी काम मिळावं, अशी तिची इच्छा आहे.9 / 10वयाच्या 16 व्या वर्षी मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण तिला खरी ओळख दिली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमानं या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते.10 / 10‘राम तेरी गंगा मैली’नंतर मंदाकिनीचे कोट्यवधी फॅन्स होते. पण करिअर फार काळ चाललं नाही. करिअरमध्ये 48 सिनेमे करणारी मंदाकिनी 2002 नंतर बॉलिवूडमधून गायब झाली. पण आता दोन दशकानंतर मंदाकिनीला पुन्हा बॉलिवूड खुणावू लागलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications