'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबातीच्या होणा-या पत्नीने घातलेले ब्रायडल फेस मास्कची किंंमत जाणून, व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:53 AM 2020-06-23T11:53:36+5:30 2020-06-23T12:10:50+5:30
बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. नुकतेच रोका सेरेमनीचे फोटो समोर आले होते. सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल झाले होते, या फोटोंना लाईक्स आणि कमेंटस करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
पुन्हा एकदा मिहीका बजाजचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे तिच्या फेस मास्कनेच लक्षवेधून घेत आहे.
मिहिका बजाजने हा फेस मास्क खास डिझाईन करून घेतला आहे. याची किंमत जवळपास लाखांत असल्याच्या चर्चा आहेत.
या फोटोंमध्ये मिहीकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
लेहंग्याला मॅचिंग असणारा फेस मास्क खास पद्धतीच्या ज्वेलरीने बनववण्यात आला आहे.
लेहंग्या प्रमाणेच ज्वेलरीचे वर्क या फेस मास्कवर करण्यात आले आहे.
राणा आणि मिहीका ऑगस्ट महिन्यात नव्या आयुष्याची सुरूवात करू शकतात अशा चर्चा आहेत.
मिहिका बजाज इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे.
तिची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर असून क्रासाला हा त्यांचा ब्रँड प्रसिद्ध आहे.