By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 12:56 IST
1 / 12रणबीर कपूर व आलियाच्या लग्नाचं सेलिब्रेशन अद्याप संपलेलं नाही. 14 एप्रिलला अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित आलिया व रणबीर यांचं लग्न पार पडलं. यानंतर रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, असं नीतू कपूर म्हणाल्या होत्या. पण 16 एप्रिलच्या रात्री आलिया व रणबीरच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन झालं. बॉलिवूडच्या आपल्या मित्रमंडळींसाठी आयोजित केलेल्या या रिसेप्शनमध्ये बी-टाऊनचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजर होते.2 / 12शनिवारी रणबीरच्या वास्तू या घरीच लग्नाचं रिसेप्शन झालं. लग्नासारखंच हे रिसेप्शनही अगदी प्रायव्हेट होतं. या रिसेप्शनला कोण कोण पोहोचलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. तर आता त्याचे व्हिडीओही समोर आले आहेत.3 / 12रिसेप्शन पार्टीत नीतू कपूर व रिद्धिमा या मायलेकींनी धमाकेदार एन्ट्री घेतली. दोघीही शायनी-शिमरी ड्रेसमध्ये दिसल्या.4 / 12आलियाची आई सोनी राजदान ही सुद्धा लेकीला आणि जावयाला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली. आलियाची बहिण शाहीन ही सुद्धा पार्टीला हजर होती.5 / 12करण जोहरही ब्लॅक आऊटफिटमध्ये या रिसेप्शन पार्टीत सामील झाला. त्याने अशी स्टायलिश एन्ट्री घेतली.6 / 12सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानची पत्नी गौरी खानची. शाहरूखही या रिसेप्शन पार्टीला पोहोचला होता. पण खास गोष्ट म्हणजे, शाहरूख व गौरी दोघंही वेगवेगळ्या गाडीतून आलेत.7 / 12रणबीर व आलियाचा खास मित्र अयान मुखर्जी हाही रिसेप्शन पार्टीला हजर होता.8 / 12आलियाची बेस्ट फ्रेन्ड आकांशा रंजन ही सुद्धा स्टनिंग लुकमध्ये रिसेप्शन पार्टीला आली. 9 / 12आलियाची मैत्रिण अनुष्का रंजन तिचा पती आदित्य सीलसोबत रिसेप्शनला पाहोचली. 10 / 12अर्जुन कपूर व मलायका अरोरा हे सुद्धा या पार्टीला हजर होते. दोघंही एकाच गाडीतून रिसेप्शन पार्टीत पोहोचले. यावेळी मलायका पिंक लुकमध्ये दिसली.11 / 12करिश्मा कपूर आपल्या लाडक्या भावाचे व वहिनीचे रिसेप्शन कसं मिस करणार. व्हाईट अॅण्ड ब्लॅक लुकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.12 / 12तारा सुतारिया ही पार्टीची शान ठरली. होय, तिने सुपर स्टायलिश लुकमध्ये या पार्टीला हजेरी लावली. बॉयफ्रेन्ड आदर जैनसोबत ती या पार्टीला पोहोचली होती.