Join us

Ranbir Kapoor's 40th Birthday Party PICS : आलियाने सेलिब्रेट केला रणबीरचा वाढदिवस, अशी रंगली धमाकेदार बर्थ डे पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:30 AM

1 / 8
आलिया भटचा पती व अभिनेता रणबीर कपूर आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करतोय. लग्नानंतरचा हा रणबीरचा पहिला वाढदिवस. त्यामुळे तो खास असणारच. शिवाय रणबीर लवकरच बाबा बनतोय म्हटल्यावर आणखीच खास. आलियाने रणबीरचा बर्थ डे दणक्यात साजरा केला.
2 / 8
काल 12 च्या ठोक्याला रणबीरने केक कापत वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थ डे पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजण हजर होते.
3 / 8
आई नीतू कपूरही लेकाच्या वाढदिवशी त्याच्या घरी पोहोचली. सोशल मीडियावरही नीतू कपूर यांनी लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
4 / 8
आलिया भटची लहान बहीण शाहीन भट ही सुद्धा आपल्या लाडक्या जीजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली.
5 / 8
कपूर कुटुंबाचा क्लोज फ्रेन्डच्या यादीत मुकेश अंबानी यांचंही नाव आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी हा सुद्धा रणबीरच्या कालच्या बर्थ डे पार्टीत हजर होता. आकाश अंबानीसोबत त्याची पत्नी श्लोक मेहता ही सुद्धा होती. तिनेही रणबीरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली.
6 / 8
रणबीर व आलियावर जीव ओवाळणारा निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हा तर पार्टीला असणारच. त्यानेही पार्टीला हजेरी लावली.
7 / 8
ब्रह्मास्त्र या सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी अशा अंदाजात पार्टीला पोहोचला. अयान हा रणबीरचा जवळचा मित्र आहे.
8 / 8
अभिनेता आदित्य राय कपूर हाही पार्टीत सहभागी झाला. मीडियाने त्याची छबी कॅमे-यात कैद केली.
टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटकरण जोहरबॉलिवूडसेलिब्रिटी