Join us

अभिनेत्री राणी चॅटर्जीने मुंबई पोलिसांचे मानले आभार, या व्यक्तीच्या विरोधात केली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 6:04 PM

1 / 8
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने नुकतेच डिप्रेशनबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
2 / 8
ही पोस्ट शेअर करून राणी चॅटर्जीने चाहत्यांना धक्का दिला होता.
3 / 8
सोशल मीडियावर राणी चॅटर्जीने धनंजय सिंग नामक व्यक्तीला डिप्रेशनसाठी जबाबदार ठरविले होते.
4 / 8
राणी चॅटर्जीने लिहिले की, हा व्यक्ती कित्येक वर्षांपासून माझ्याबद्दल घाणेरड्या गोष्टी फेसबुकवर लिहत आहे.
5 / 8
मी खूप दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला. बऱ्याच लोकांशी बोलले. सगळ्यांनी सांगितले की दुर्लक्ष कर. मी पण माणूसच आहे.
6 / 8
तिने पुढे लिहिले की यामुळे मी मानसिक दबावातून जात होते.
7 / 8
पुढे तिने लिहिले की कदाचित त्याला मी जीव द्यावा असे वाटत असेल. या व्यक्तीमुळे माझे जीवन खूप तणावात आहे.
8 / 8
तिने मुंबई पोलिसांना विनंती केली की जर मी काही बरे वाईट केले तर त्यासाठी धनंजय सिंग जबाबदार असेल.
टॅग्स :मुंबई पोलीस