Join us

रणवीर अलाहाबादियाचं वादात अडकण्यापूर्वीच झालं होतं ब्रेकअप, 'या' अभिनेत्रीला करत होता डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:14 IST

1 / 8
युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) सध्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या शोमध्ये त्याने आक्षेपार्ह जोक केला. ज्यामुळे त्याच्यावर आता गुन्हाही दाखल झाला आहे.
2 / 8
रणवीर काही पहिल्यांदा चर्चेत आला नाहीए. काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या गर्लफ्रेंडमुळेही चर्चेत होता. रणवीरनेही त्यांचं नातं सोशल मीडियावर अधिकृत केलं होतं.
3 / 8
निक्की शर्मा (Nikki Sharma) असं रणवीरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. निक्की टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 'दहलीज','ससुराल सिमर का' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
4 / 8
काही दिवसांपूर्वीच रणवीर गर्लफ्रेंडसह गोव्याला गेला होता. तिथूनही त्याने तिच्यासोबत फोटो पोस्ट करत रिलेशनशिप अधिकृत केलं होतं. मात्र यात त्याने तिचा चेहरा आणि नाव रिव्हील केलं नव्हतं.
5 / 8
गोव्यात त्यांच्यासोबत एक दुर्दैवी घटनाही घडली. दोघंही समुद्रात बुडता बुडता वाचले होते. लाटांच्या प्रवाहात आल्याने ते आत आत जात होते. जवळच पोहत असलेल्या एका कपलने त्यांना वाचवलं.
6 / 8
रणवीरने ही धक्कादायक घटना नंतर सोशल मीडियावर शेअर केली होती. याच्या काही दिवसांनीच रणवीर आणि निक्कीच्या ब्रेकअपची बातमी आली. रणवीरने क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्यामुळे त्याचं ब्रेकअप कन्फर्म झालं. शिवाय दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केलं.
7 / 8
रणवीर अलाहाबादिया आता पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह जोकमुळे वादात अडकला. या वादानंतर त्याचं ब्रेकअप झाल्याची चर्चा झाली. मात्र या वादाच्या आधीच त्यांचं नातं तुटलं होतं.
8 / 8
रणवीरने वादानंतर व्हिडिओ शेअर माफी मागितली. त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. तसंच तो एपिसोडही आता युट्यूबवरुन हटवण्यात आला आहे.
टॅग्स :रणवीर अलाहाबादियासोशल मीडियाट्रोलटिव्ही कलाकार