सर्वांदेखत रोमॅन्टिक झाला रणवीर सिंग, लाजून चूर झाली दीपिका पादुकोण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:26 IST
1 / 6 आज रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण लग्नानंतरचा पहिला व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहेत. पण खरे सांगायचे तर या दोघांच्या व्हॅलेन्टाईन डे सेलिब्रेशनला कालचं सुरुवात झाली. काल दीपवीर ‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेत आणि दोघांचाही रोमॅन्टिक मूड पाहून सगळेच ‘खल्लास’ झालेत. दीपवीरच्या रोमॅन्टिक मूडचे काही क्षण कॅमे-यात कैद झालेत.2 / 6रणवीर व दीपिका एकाच गाडीतून ‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेत. मग काय, गाडीतचं रणवीर दीपिकावर लट्टू झाला. इतका की, दीपिका लाजून लाजून चूर झाली.3 / 6प्रत्येक फोटोत दीपिका खळखळून हसताना दिसली.4 / 6यावेळी रणवीर दीपिकाच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसला अन् त्याचे ते कुजबुजणे ऐकून दीपिकाची कळी खुलली.5 / 6यानंतर रणवीरने दीपिकाला जवळ घेतले. त्यांचा हा रोमॅन्टिक अंदाज चर्चेचा विषय ठरला. ‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या निमित्ताने रणवीरने खºया अर्थाने व्हॅलेन्टाईन डे साजरा केला, असे म्हटले तरी चालेल.6 / 6‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगला केवळ दीपवीरचं नाही तर त्यांचे अख्खे कुटुंब हजर होते.