Join us

Rashami Desai : “मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:45 PM

1 / 10
रश्मी देसाई टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने टीनएजमध्ये इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली आणि अल्पावधीत ती लोकप्रिय झाली आहे.
2 / 10
यादरम्यान रश्मीला काही वाईट अनुभवांनाही सामोरं जावं लागलं. अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे.
3 / 10
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कास्टिंग काउचचा कसा सामना केला हे रश्मीने सांगितलं. तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.
4 / 10
एका मुलाखतीत रश्मी म्हणाली, “मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं. तिथे गेल्यावर मला दिसलं की, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही.”
5 / 10
“तेव्हा मी १६ वर्षांची होते, त्याने मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी अस्वस्थ होते आणि तिथून कसंबसं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.”
6 / 10
“काही तासांनंतर मी आईला हा धक्कादायक प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी मी आईसोबत त्या व्यक्तीला भेटायला गेले.”
7 / 10
“त्यानंतर आईने त्याला धडा शिकवण्यासाठी कानशिलात लगावली. कास्टिंग काउच अनेकांचं होत असतं. प्रत्येक उद्योगात वाईट आणि चांगले लोक असतात.”
8 / 10
“मी भाग्यवान आहे की, यानंतर मी अनेक चांगल्या लोकांसोबत काम केलं. त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला होता.”
9 / 10
रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
10 / 10
टॅग्स :रश्मी देसाईटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकास्टिंग काऊच