46 वर्षांची झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, इतक्या कमी वयात आहे एका नातवाची आजी.... By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 1:36 PM1 / 10बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडन आज आपला बर्थडे सेलिब्रेट करते आहे. रवीवाने आपल्या सिनेमामधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. रवीना 46व्या वर्षी आजी झाली आहे. (Photo Instagram)2 / 10रवीना 2019 मध्ये आजी झाली आहे. रवीनाने आपल्या नातवासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. (Photo Instagram)3 / 10रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती.(Photo Instagram)4 / 10रवीना टंडनने या दोन्ही मुली वाढवल्या आणि त्यांचे लग्न केले. छायाने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव रुद्र ठेवण्यात आले. रुद्रबरोबरचे फोटो रवीना अनेकवेळा शेअर करत असते.(Photo Instagram)5 / 1022 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. (Photo Instagram)6 / 10रवीनाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. (Photo Instagram)7 / 10तिने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. (Photo Instagram)8 / 10मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram)9 / 10‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. (Photo Instagram)10 / 10रवीना लकरच सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ या सिनेमात झळकणार आहे. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications