विदेशात शिक्षण घेतोय रवी जाधवचा लाडका लेक; लाइमलाइटपासून आहे कोसोदूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:40 IST
1 / 8मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव.2 / 8नटरंग, न्यूड, टाइमपास, बालगंधर्व, ताली, मैं अटल हूँ यांसारखे अनेक हिंदी,मराठी सिनेमा, वेबसीरिजचं दिग्दर्शन करुन त्याने इंडस्ट्रीवर त्याची छाप पाडली आहे.3 / 8रवी जाधवच्या प्रोफेशनल लाइफविषय़ी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला माहित नाही. 4 / 8रवी जाधवला अंश आणि अर्थव ही दोन मुलं आहेत. यात अर्थवची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.5 / 8रवी जाधवने त्याच्या लेकाविषयी पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांचं लक्ष त्याच्या लेकाकडे वळलं आहे. त्याचा मुलगा काय करतो, कसा दिसतो असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.6 / 8अर्थव नुकताच पदवीधर झाला आहे. त्यानिमित्ताने रवी जाधवने पोस्ट शेअर केली आहे.7 / 8अर्थवने कॅनडातील एका मोठ्या कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवली आहे. यावेळचा फोटो रवी जाधवने शेअर केला आहे. सोबत पोस्टही लिहिली आहे.8 / 8'पालकांसाठीचा अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली. आणि, आमच्यासाठी यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. त्याला ही उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचं ध्येय साध्य करताना पाहणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता. इथे त्याच्यासमोर आयुष्याचा पुढचा मोठासा प्रवास आहे आणि खूप चांगल्या संधी त्याची वाट बघतायत, असं कॅप्शन रवी जाधवने दिले.