सिद्धार्थ चांदेकर ते सखी गोखले! 'या' ६ कलाकारांच्या आईदेखील आहेत मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 1:09 PM1 / 15सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा होत असते. यात आजवर बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक स्टारकिड्सने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. केवळ इतकंच नाही तर मराठी कलाविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत या विश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे हेच कलाकार आज लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आईप्रमाणेच मराठी कलाविश्वात नशीब आजमावणारे कलाकार कोणते ते पाहुयात.2 / 15सखी गोखले - 'दिल दोस्ती दुनियादारी', 'अमर फोटो स्टुडिओ' अशा अनेक मालिका, नाटक यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सखी गोखले.3 / 15सखी गोखले आज मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. परंतु, सखीप्रमाणेच तिची आईदेखील दिग्गज अभिनेत्री आहे. सखी अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक आहे. शुभांगी गोखले यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'राजा रानीची गं जोडी' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.4 / 15सिद्धार्थ चांदेकर - मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक सिद्धार्थ चांदेकरचे आजवर असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच त्याचा 'झिम्मा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे सिद्धार्थची आईदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.5 / 15सिद्धार्थ चांदेकरच्या आईचं नाव सीमा चांदेकर असं असून त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत. सिद्धार्थ आणि त्याच्या आईने 'जिवलगा' या मालिकेत मायलेकाची भूमिका साकारली होती. 6 / 15सोहम बांदेकर - अभिनेता आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर याने अलिकडेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत त्याने इन्स्पेक्टर जय ही भूमिका साकारली आहे.7 / 15सोहम हा आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक आहे. सुचित्रा बांदेकर यांनी 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'सिंगम', 'सिंबा' , 'इश्क वाला लव' यांसारख्या हिंदीसह मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.8 / 15अभिनय बेर्डे - ती सध्या काय करते या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक आज असंख्य तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्याप्रमाणेच त्याची आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.9 / 15प्रिया बेर्डे हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. ९० चा काळ प्रिया बेर्डे यांनी विशेष गाजवला आहे. याच प्रिया बेर्डे यांचा लेक अभिनय आहे. अभिनयने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं.10 / 15श्रिया पिळगांवकर - एकुलती एक या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर. मराठी चित्रपटांसह श्रियाने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं.11 / 15श्रिया अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांची लेक आहे. बनवाबनवी ,आम्ही सातपुते अशा असंख्य चित्रपटांमध्ये सुप्रिया पिळगांवकर झळकल्या आहेत.12 / 15सई मांजरेकर - सलमान खानच्या दबंग ३ या बॉलिवूड चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सई मांजरेकर.13 / 15सई ही अभिनेत्री मेधा मांजरेकर व महेश मांजरेकर यांची लेक आहे. मेधा यांनी काकस्पर्श , दे धक्का, नटसम्राट, बंध नायलॉनचे या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.14 / 15विराजस कुलकर्णी- विराजस अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. अलिकडेच त्याने आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने साखरपुडा केला त्यामुळे विराजस चर्चेत आहे. विशेष म्हणजे विराजस अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा लेक आहे.15 / 15अवंतिका, सोनपरी या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मृणाल कुलकर्णीचा लेक विराजस आहे. मृणाल मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications