Join us

पहिल्या पत्नीवर होतं फरहान अख्तरचं जीवापाड प्रेम; डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला सुखाचा संसार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 1:32 PM

1 / 10
दिग्दर्शक, गायक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका साकारत कायम प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला बॉलिवूड स्टार म्हणजे फरहान अख्तर (Farhan Akhtar) . सोशल मीडियावर सक्रीय असलेला फरहान त्याच्या प्रोफेशन लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो.
2 / 10
२०१८ पासून फरहान अभिनेत्री शिबानी दांडेकरला (Shibani Dandekar) डेट करत आहे. विशेष म्हणजे या जोडीची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. आज कलाविश्वातील बहुचर्चित कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं.
3 / 10
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत फरहान-शिबानीची कायम चर्चा रंगत असते. मात्र, फरहानच्या पहिल्या पत्नीविषयी फार कमी जणांना माहित आहे.
4 / 10
शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले.
5 / 10
अधुना ही कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट असून बी ब्लंट या सॅलॉनची ओनर आहे.
6 / 10
फरहान आणि अधुनाचं लव्हमॅरेज होतं. या अधुनाही फरहानपेक्षा ६ वर्षांनी मोठी असल्याचं सांगण्यात येत. १९९७ मध्ये एका नाईट क्लबमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी 2000 मध्ये लग्नगाठ बांधली.
7 / 10
फरहानचं अधुनावर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे तिच्या ४० व्या वाढदिवशी त्याने हिऱ्याची अंगठी तिला गिफ्ट केली होती. परंतु, लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला.
8 / 10
२०१७ मध्ये या दोघांनी वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, अधुनाच्या आयुष्यात निकोलो मोरियाची एन्ट्री झाल्यामुळे त्यांच्या संसारात फूट पडली.
9 / 10
अधुना, निकोला मोरियाला डेट करत असल्यामुळे फरहानने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.
10 / 10
निकोल मोरिया हा अभिनेता डिनो मोरियाचा भाऊ आहे.
टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकरसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा