reem Shaikh wants to marry before turning 30 family planning at the age of 22
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 6:57 PM1 / 10टीव्ही अभिनेत्री रीम शेखने वयाच्या २२ व्या वर्षीच फॅमिली प्लॅनिंग केलं आहे. लग्नापासून ते मुलांपर्यंतचं सर्व प्लॅनिंग आतापासूनच करून ठेवलं आहे. रीमने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.2 / 10अभिनेत्रीने वयाच्या ३० व्या वर्षाआधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीत तिने तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल सांगितलं आहे. सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे.3 / 10टाईम्स ऑफ इंडियाशी खास संवाद साधताना रीम शेखने तिच्या फॅमिली प्लॅनिंगबाबत सांगितलं. वयाच्या ३०-३५ व्या वर्षी लग्न करणाऱ्या किंवा नाही करणाऱ्या लोकांपैकी मी नाही असं तिने स्पष्टच सांगितलं.4 / 10रीम पुढे म्हणाली, 'मला वयाच्या ३० व्या वर्षाआधीच लग्न करायचं आहे. मला माझं कुटुंब हवं आहे. मला प्रेम करायचं आहे. हा माझा प्लॅन आहे.'5 / 10'मला माहीत आहे की, हे सर्व होईल आणि ते भारीच असेल. मला जे हवं आहे, देवाने माझ्यासाठी त्याचाच विचार केला आहे. जेव्हा ते होईल तेव्हा तुम्हाला समजेल. यामुळेच माझे लोकांशी असलेले संबंध, नातं जास्त वेळ राहत नाही.'6 / 10अलीकडेच लाफ्टर चॅलेंजच्या सेटवर रीम शेखसोबत एक दुर्घटना घडली. तिच्या चेहऱ्यावर गरम तेल उडालं. त्यामुळे तिचा चेहरा भाजला. याबद्दल बोलताना रीम म्हणाली होती की, ती एका वाईट अपघातातून वाचली आहे.7 / 10रीम चक्रवर्ती अशोक सम्राट, तुझसे है राबता, फना यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. रीमने तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकने नेहमीच इम्प्रेस केलं आहे. 8 / 10अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह आहे. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. 9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications