पतीच्या निधनानंतरही रेखा सिंदूर का लावतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:59 AM1 / 9सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रेखा आजही त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालतात. आज त्यांचा ६९वा वाढदिवस आहे. रेखा आजही सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतात. उतारवयातही त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. 2 / 9अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेल्या रेखा बॉलिवूडमधील करिअरबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. रेखा यांचे अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. केवळ अमिताभ बच्चनच नाही तर अनेक बॉलिवूड अभिनेत्यांबरोबर रेखा यांचं नाव जोडलं गेलं होतं. 3 / 9रेखा यांनी १९९० साली प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. पण लग्नाच्या काहीच महिन्यानंतर मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यानंतर रेखा यांनी दुसरं लग्न केलं नाही. पण, पतीच्या निधनानंतरही त्या प्रत्येक फंक्शन आणि बॉलिवूड पार्टीमध्येही सिंदूर लावताना दिसल्या. 4 / 9रेखा यांच्याबाबत चाहत्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांमधील एक म्हणजे रेखा सिंदूर का लावतात? अनेकदा याबाबत त्यांना मुलाखतीतही थेट विचारण्यात आलं होतं. पण, तेव्हाही रेखा यांनी याबाबत बोलणं टाळलं होतं. 5 / 9खरं तर रेखा यांच्या सिंदूर लावण्याबाबत चर्चा सुरू झाली ती ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नामुळे. त्यांच्या लग्नात रेखा सिंदूर लावून गेल्या होत्या. या लग्नामुळे त्यांच्या भांगेतील सिंदूर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलं. 6 / 9एका मुलाखतीत त्यांनी यामागचं स्पष्टीकरण दिलं होतं. थेट शूटिंगवरुन लग्नाला आल्यामुळे मंगळसूत्र आणि सिंदूर काढायला विसरल्याचं रेखा यांनी सांगितलं होतं. 7 / 9रेखा सिंदूर का लावतात याबाबत अनेक तर्क वितर्क त्यांच्या चाहत्यांकडून लावले जातात. रेखा यांचं अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. त्यांना बिग बींबरोबर लग्न करायचं होतं. पण, ते शक्य झालं नाही. अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमामुळे रेखा त्यांच्या नावाचं सिंदूर लावतात, असंही म्हटलं जातं. 8 / 9भांगेत सिंदूर भरल्यामुळे रेखा यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यामुळे त्या केवळ सुंदर दिसण्यासाठी सिंदूर लावतात, असंही म्हटलं जातं. 9 / 9पतीच्या निधनानंतरही सिंदूर लावण्याबाबत रेखा यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. 'मी ज्या शहरातून आले आहे तिथे सिंदूर लावण्याची फॅशन आहे. मला असं वाटतं की सिंदूर मला शोभतं,' असं त्या म्हणाल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications