किस्सा: जेव्हा रेखाने पुरूष आणि सेक्सवर केलं होतं वक्तव्य, ज्यामुळे उडाली होती खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 3:58 PM1 / 8रेखा बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी आहे जी आपल्या अभिनयासाठी आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. रेखाने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सोबतच ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. आता ती सिनेमात भलेही दिसत नाही, पण तिचे किस्से आजही फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरतात. एकदा रेखाने शारीरिक संबंधावर हैराण करणं असं वक्तव्य केलं होतं. जे ऐकून सर्वांचेच कान टवकारले होते.2 / 8रेखाच्या बायोग्राफीमध्ये तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से आहेत. या पुस्तकात तिने अनेक विधानही आहेत. जे बऱ्याच वर्षांपासून चर्चेत आहेत. एकदा रेखाने पुरूष आणि शारीरिक संबंधावर वक्तव्य केलं होतं.3 / 8या पुस्तकानुसार, एकदा रेखाने एका सिने पत्रकाराला सांगितलं होतं की, जर तुम्हाला एखाद्या पुरूषाच्या जवळ जायचं असेल तर केवळ सेक्सच्या माध्यमातूनच जाऊ शकता. तुम्ही एखाद्या पुरूषाच्या जवळ तोपर्यंत जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत सेक्स केला नाही. रेखाच्या या वक्तव्याने खळबळ उडाली होती. 4 / 8याव्यतिरिक्तही रेखाने सेक्स लाइफबाबत अनेक वक्तव्ये केली होती. एकदा रेखाने तिच्या वक्तव्यातून लग्नाआधी सेक्सवरही सहमती दर्शवली होती. इतकंच नाही तर ती म्हणाली होती की, असे विचार न करणारे लोक हे ढोंगी असतात असंही ती म्हणाली होती. 5 / 8रेखा म्हणाली होती की, लग्नाआधी जर सेक्स होत असेल तर ही नैसर्गिक बाब आहे. जे लोक असं म्हणतात की, तरूणींनी लग्नाआधी सेक्स करू नये ते लोक ढोंगी असतात.6 / 8रेखाचं करिअर फारच हिट होतं. पण तिचं खाजगी आयुष्य फार अडचणींचं गेलं. तिने तिच्या खाजगी आयुष्यात खूप वाईट दिवस पाहिले. इतकंच नाही तर तिच्या वक्तव्यांचा प्रभावही तिच्या आयुष्यावर पडला आणि हे तिने तिच्या बायोग्राफीमध्ये सांगितलं. 7 / 8रेखाच्या बायोग्राफीनुसार, या वक्तव्यांमुळे विनोद मेहराच्या आईने रेखाला स्वीकारण्यास नकार दिला होता. विनोद मेहरासोबत रेखाने लग्न केलं होतं. पण त्याच्या आईने तिला कधीच स्वीकारलं नाही. त्यामुळे ते वेगळे झाले.8 / 8रेखाने १९९० मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं होतं. ती सुरूवातीला आपल्या लग्नामुळे खूप आनंदी होती. पण तिचं हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच मुकेशने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुकेशने एक सुसाइड नोटही लिहिली होती. ज्यात त्याने त्याच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नसल्याचं लिहिलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications