रेखा यांचं किती वेळा झालंय लग्न, वयाची 69 वर्ष उलटूनही अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य! By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:07 PM1 / 10अभिनेत्री रेखा यांच नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. जगभरात एक एव्हरग्रीन अभिनेत्री अशी त्यांची ख्याती आहे.2 / 10येत्या १० ऑक्टोंबरला त्याचा वाढदिवस आहे. 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नई येथे रेखा यांचा जन्म झाला. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा जेमिनी गणेशन असं आहे.3 / 10रेखा यांनी याच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘रंगुला रत्नम’ या तेलुगू चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या कारकिर्दित रेखा यांनी 'खूबसूरत', 'उमराव जान', 'मुकद्दर का सिकंदर' असे सुपरहिट सिनेमे दिलेत. 4 / 10आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यांने त्यांनी चाहत्यांना वेड लावलं. आजही प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसतात. पण, रेखा या अभिनयाबरोबरच वैयक्तिक गोष्टींमुळे जास्त चर्चेत राहल्यात.5 / 10 विनोद मेहरा तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं नाव जोडलं गेलं होतं. 6 / 10 अमिताभ बच्चन यांच्यावर रेखा प्रचंड प्रेम करत होत्या. पण ते विवाहित असल्यामुळे दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली.7 / 10यानंतर रेखा यांच्या आयुष्यात आले उद्योजक मुकेश अग्रवाल. रेखा आणि मुकेश यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी स्वतःला संपवलं.8 / 10 मुकेश यांच्या निधनानंतर रेखा यांच्या आयुष्यात विनोद मेहरा यांनी एन्ट्री घेतली. अशी चर्चा आहे की, दोघांनी गुपचूप लग्न देखील केलं होतं. पण, विनोद यांच्या आईला रेखा पसंत नसल्याने त्यांचं नात देखील तुटलं.9 / 10 रेखा यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात एक प्रश्नही आहे की रेखा कोणाच्या नावाने कपाळावर कुंकू लावतात? १९८० मध्ये रेखा ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात सिंदूर परिधान करून पोहोचल्या होत्या. यावेळी रेखा यांच्या कपाळावरील सिंदूर प्रकाशझोतात आले. या लग्नात रेखा यांनी अमिताभ यांच्या नावाने सिंदूर लावल्याची चर्चा रंगली होती. अखेर रेखा यांनी या सर्व चर्चांचं उत्तर दिलं होतं की, 'मी कोणाच्याही नावाचं सिंदूर लावत नाही. मी माझ्या फॅशनसाठी सिंदूर लावते. माझ्या मेकअपवर सिंदूर लावल्यामुळे माझं सौंदर्य आणखी फुलून दिसतं. म्हणून मी सिंदूर लावते'. 10 / 10रेखा यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण त्या कधीही खचल्या नाही आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभ्या राहिल्या. रेखा या गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. पण रेखा प्रत्येक इव्हेंटमध्ये अन् पिक्चरच्या स्क्रिनिंगमध्ये हजर असतात. कायम इव्हेंटमध्ये रेखा त्यांच्या पारंपरिक साडी आणि लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधतात. आणखी वाचा Subscribe to Notifications