हिरोईन नव्हे, रेखाचं फक्त घर आणि मुलं सांभाळायचं छोटसं स्वप्न होतं...! By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 1:45 PM1 / 9सौंदर्याची खाण म्हणजे अभिनेत्री रेखा. वयाच्या उण्यापु-या 13 व्या वर्षी तिनं अॅक्टिंगला सुरूवात केली आणि बघता बघता इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री बनली. पण खरं सांगायचं तर या रेखाला हिरोईन व्हायचं नव्हतंच मुळी.2 / 9तिच्या मनात काहीतरी वेगळंच बनायचं होतं. एका जुन्या मुलाखतीत ती यावर बोलली होती.3 / 9मला कधीच हिरोईन बनायचं नव्हतं. तसा विचारही मी कधी केला नव्हता. मला लग्न करायचं होतं आणि खूप सारी मुलं हवी होती, असं ती म्हणाली होती.4 / 9लग्न करून मला सुखात संसार करायचा होता. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा आणि माझी काळजी घेणारा नवरा हवा होता आणि खूप सारी मुलं जन्माला घालायची होती, असं तिनं सांगितलं होतं.5 / 9मी एक यशस्वी अभिनेत्री बनेल, असं माझ्या शाळेतल्या मित्रांनाही वाटलं नव्हतं. पण ‘सावन भादो’ हिट झाला आणि मी अचानक मी प्रकाशझोतात आले. मला पाहून माझे मित्र माझ्यावर जळायला लागले होते, असंही तिनं सांगितलं होतं.6 / 9यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’मध्ये रेखाच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला गेला आहे. 1990 साली रेखानं बिझनेसमॅन मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं होतं. पण लग्नानंतर 7 महिन्यांतच मुकेश यांनी आत्महत्या केली होती.7 / 9रेखा व अभिनेता विनोद मेहरा यांच्या सीक्रेट मॅरेजच्या चर्चा तर आजही होता. दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा त्यावेळी होती.8 / 9यासिर उस्मान यांच्या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, रेखा विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आली त्यावेळी तिच्या सासूनं तिला मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकंच नाही तर तिला घराबाहेरही हाकलवून लावलं होतं. रेखाच्या डोळ्यात अश्रू होते. डबलेल्या डोळ्यांनी ती तिथून निघून गेली होती. विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. 9 / 9 तूर्तास गुम है किसी के प्यार में या मालिकेच्या प्रोमोमुळे रेखा चर्चेत आहे. या मालिकेच्या प्रोमोतील एक मिनिटांच्या भूमिकेसाठी तिनं 5 ते 7 कोटी मानधनं घेतल्याची चर्चा आहे. या प्रामोमध्ये रेखा मालिकेतील सई आणि विराट यांची कथा सांगताना दिसत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications