रेश्मा शिंदेच्या नवऱ्याचं नाव काय? फोटो सोशल मीडियावर व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 9:22 AM1 / 9 'घरोघरी मातीच्या चुली'मधली जानकी असो किंवा 'रंग माझा वेगळा'मधली दीपा अभिनेत्री रेश्मा शिंदे महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.2 / 9आता रेश्मा शिंदे आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 3 / 9तिचा घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली असून नुकताच तिचा मेहंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.4 / 9रेश्माने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केळवण आणि मेंहदी सोहळ्यात तिने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर केला नव्हता. 5 / 9ती नेमकं कुणाशी लग्न करतेय, ही बाब गुलदस्त्यातच होती. पण, आता हळदीच्या दिवशी रेश्माने तिच्या नवऱ्याचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.6 / 9पारंपारिक पद्धतीने रितीरिवाजानूसार रेश्माचा हळदी सोहळा पार पडला. त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.7 / 9रेश्माने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केले आहेत. त्याच्या प्रोफाइलवरुन त्याचे नाव पवन असल्याचे समोर आले. 8 / 9पण, तो नेमकं काय काम करतो, हे अद्याप उघड झालेले नाही. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याविषयी इतर तपशील अद्याप उपलब्ध नाही.9 / 9रेश्मा ही आज २९ नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. या लग्न सोहळ्यात मनोरंजन विश्वातील कोण कोण मंंडळी उपस्थित राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications