IN PIC: बदला? म्हणून रिया चक्रवर्तीने दिला होता ‘तो’ किसींग सीन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:26 IST
1 / 8सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती कायम चर्चेत आहे. आजही तिच्याबद्दलचे रोज नवे खुलासे होत आहेत. सुशांतआधी रिया आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती़, असा खुलासा अलीकडे सुशांतच्या मैत्रिणीने केला होता. आता त्यापुढचा खुलासा आणखी शॉकिंग आहे.2 / 8रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्ती व आदित्य रॉय कपूर 2012 ते 2014 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले़ या ब्रेकअपनंतर आदित्य व रिया कधीच एकमेकांशी बोलले नाहीत. पण...3 / 8पण, रिपोर्टनुसार, रियासोबतच्या ब्रेकअपनंतरही आदित्य तिच्यावर प्रचंड प्रेम करतो. आदित्य आजही रियासाठी पजेसिव्ह आहे.4 / 82014 मध्ये एका अवार्ड फंक्शनमध्ये रियाला आदित्यला अवार्ड देण्याची विनंती केली होती. पण रियाने म्हणे यासाठी नकार दिला होता. कारण ती इंडस्ट्रीत नवखी होती. शिवाय तिचे व आदित्यचे अफेअर जगापुढे यावे, अशी तिची इच्छा नव्हती.5 / 8असे म्हणतात की, रियाने ‘सोनाली केबल’ या सिनेमात अली फजलसोबत किसींग सीन करायला नकार दिला होता. पण ‘आशिकी 2’मध्ये आदित्यने श्रद्धा कपूरसोबत किसींग सीन केला. याचा बदला रियाने कसा घेतला तर, ती सुद्धा अली फजलसोबत किसींग सीन द्यायला तयार झाली. त्याकाळी आदित्य व श्रद्धाच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या.6 / 8सुशांतच्या निधनानंतर रियाच्या कॉल रेकॉर्डमधून ती आदित्यच्या टचमध्ये असल्याचे समोर आले होते. अर्थात आता त्यांच्यात कदाचित मैत्रीचे नाते उरले आहे.7 / 8सुशांतच्या निधनानंतरच्या तपासात रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समध्ये आदित्य राय कपूरचे नावही समोर आले होते. रियाने आदित्यला 23 वेळा कॉल केला होता.8 / 8सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. एनसीबीने न्यायालयासमोर 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.