रिया चक्रवतीने सुशांतसोबत नात्यात असल्याची दिली पोलिसांनी कबुली, म्हणाली- याच वर्षी करणार होतो लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:00 PM2020-06-19T18:00:53+5:302020-06-19T18:00:53+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे.

गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीची तब्बल 9 तास विचारपूस करत तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

पोलिस चौकशीत रियाला तिचे सुशांतसोबतचे संबंध, दोघांची बॉन्डिंग, त्याचे डिप्रेशन आणि सुशांतचे इंडस्ट्रीसोबतचे संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेत

सुशांत व मी लवकरच घर घेणार होतो आणि 2020 च्या अखेरपर्यंत लग्न करण्याचा आमचा विचार होता़, असे रियाने पोलिसांना सांगितल्याचे कळते.

रिया व सुशांत कार्टर रोडस्थित पेंटहाऊसमध्ये राहत होते. येथे सुशांतचा मित्रही त्यांच्यासोबत राहायचा.

रियाने सुशांतचे घर सोडण्यापूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणानंतरचे एकमेकांना केलेले मॅसेजही तिने पोलिसांना दाखवले.

रियाने पोलिसांना सविस्तर उत्तरं दिली.