रिया चक्रवर्तीने शेअर केलं तिच्या डायरीचं पान, ज्यात सुशांतच्या हस्ताक्षरात लिहिलंय खूप काही! By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 2:33 PM1 / 10सुशांत सिंह राजपूत्या मृत्यूनंतर त्याच्या सुसाइड केसची चौकशी होत आहे. या केसबाबत दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. अशात वेगवेगळ्या कारणांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती ही संशायाच्या जाळ्यात अडकली आहे.2 / 10वेगवेगळ्या आरोपांनंतर रिया चक्रवर्तीने शुक्रवारी ईडी ऑफिसमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. आता रियाने तिच्या डायरीचं एक पान शेअर केलं आहे. रियाने दावा केलाय की, तिच्या डायरीमध्ये सुशांतद्वारे काही गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.3 / 10रियाने दावा केला आहे की, सुशांतची निशाणी आणि प्रॉपर्टीच्या रूपात तिच्याकडे केवळ ही डायरी आहे. ज्यावर सुशांतने तिच्याबाबत आणि तिच्या परिवाराबाबत लिहिलं होतं. रियाने दावा केलाय की, या डायरीतील अक्षर हे सुशांतचं आहे.4 / 10या डायरीचा फोटो पाहिला तर लक्षात येतं की, लिहिणाऱ्याने लिहिलं की, तो त्याच्या जीवनासाठी आभारी आहे. सोबतच लिल्लू, बेबू, सर, मॅम आणि फज जीवनात असल्याने तो आभारी आहे.5 / 10रियाने इंडिया टुडेला सांगितलं की, 'ही हॅंडरायटिंग सुशांतची आहे. लिल्लू शोविक आहे, बेबू मी आहे, सर माझे वडील आणि मॅम माझी आई आहे. सोबतच फज सुशांतच्या डॉगीचं नाव आहे'. रियाने तिच्या वकिलाच्या माध्यमातून तिच्या डायरीचं पान शेअर केलंय.6 / 10सोबतच रियाने असंही म्हणाली की, या डायरीशिवाय तिच्याकडे सुशांतची निशाणी म्हणून त्याचं एक सिपर आहे.7 / 10दरम्यान शुक्रवारी रिया चक्रवर्तीसहीत तिच्या परिवाराला विचारपूस करण्यात आली. यात सुशांतच्या अकाऊंटमधून १५ कोटी रूपये काढणे, तसेच रिया आणि तिच्या भावाच्या स्टार्टअप कंपन्यांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.8 / 10ईडीने रिया चक्रवर्तीला सुशांत केसबाबत आठ तासांपेक्षा अधिक विचारपूस केली. रियाकडून तिच्या संपत्तीबाबत, उत्पन्नाबाबत विचारपूस करण्यात आली. रिया चक्रवर्तीने ईडीला ऑडीट रिपोर्टही दिला आहे. 9 / 10ईडी ऑफिसमध्ये रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही २ तास विचारपूस करण्यात आली. शोविक आणि सुशांत चांगले मित्र होते. असेही सांगितले जाते की, दोघे नेहमीच वेळ घालवत होते.10 / 10सध्या सुशांत केसची आता सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. असे मानले जात आहे की, सीबीआय लवकरच रिया चक्रवर्तीची विचारपूस करतील. अशात रियाने शेअर केलेल्या या डायरीच्या पानामुळे केसला नवं वळण मिळू शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications